शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- नागपूर-रत्नागिरी महामार्ग: जमीन जाणार अन् भाव नाही मिळणार; भुयेतील ५८ शेतकरी कुटुंबे न्यायालयात 

By संदीप आडनाईक | Updated: March 12, 2024 12:58 IST

चुकीच्या रेखांकनाचा भुये, भुयेवाडी गावच्या शेतकऱ्यांना फटका

संदीप आडनाईककोल्हापूर : रस्त्यासाठी भूसंपादन करताना चुकीचे रेखांकन झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील भुये आणि भुयेवाडी गावचे ५८ शेतकरी कुटुंबे न्यायालयात गेली आहेत. राज्यमार्ग, प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासाठी एकाच गटातील जमिनींचे तीनवेळा संपादन झाले आहे. ताज्या रेखांकनानुसार या भागातील एकाच ३४ गटांतील दोनशे कुटुंबातील २००० शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. हातची जमीन तर जाणारच परंतु महामार्गाऐवजी प्राधिकरणाचा निकष लावल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे ते वेगळेच.नागपूर-रत्नागिरी (एनएच-१६६) हा महामार्ग राज्यमार्ग एसएच-१९४ च्या दुतर्फा घेऊन अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या गूळ पट्ट्यातील बागायती जमिनी वाचविण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने १३ फेब्रुवारी २०२३ रोजी घेतला होता. राज्यमार्ग एसएच-१९४, प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग एसएच-१९४ (४५ मीटर) आणि नागपूर-रत्नागिरी एनएच-१६६ (६० मीटर) या राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनींचे आतापर्यंत तीनवेळा संपादन झाले आहे.विशेष म्हणजे हे भूसंपादन ९५ टक्के शेतकऱ्यांच्या ३४ क्रमांकाच्या एकाच गटातील जमिनीतून होत आहे. भुये आणि भुयेवाडी येथे एक किलोमीटरमध्ये सध्याचा हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) डिझाईन ऑफ एक्स्पर्ट कमिटीच्या शिफारशीनुसार राज्यमार्ग एसएच-१९४च्या समांतर होत आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे तर आहेच शिवाय त्यांना भूमीहीन व्हावे लागणार आहे, ते वेगळेच.

मोबदल्याचा दर निम्म्यापेक्षाही कमीही गावे प्राधिकरणात समाविष्ट केल्याने भूसंपादनाचा मोबदला ठरविताना राष्ट्रीय महामार्गाऐवजी प्राधिकरणाचे नियम लावले आहेत. त्यामुळे शहराजवळील या गावांना ८ ते १० लाख रुपये दर अपेक्षित असताना त्यांच्या निम्म्यानेही दर निश्चित होत नाही. याउलट डोंगरभागातील काही गावे महामार्ग प्रकल्पात जात असल्यामुळे त्यांना चांगले दर मिळत आहेत.

शासनाकडे सादर अहवाल लालफीतीतयाविरुद्ध संबंधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली होती, परंतु याकडे कुणी लक्ष दिलेले नाही. भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांनी हा विषय सध्या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत नेला आहे. तेथे न्याय मिळाला नाही तर या जमिनी मातीमोल भावाने सरकारच्या ताब्यात जाण्याची भीती आहे. या शेतकऱ्यांना जादा दर मिळावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी एक वर्षांपूर्वी शासनास अहवाल दिला आहे, मात्र तो लालफितीत अडकला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग