नागोजीराव, जवाहर हायस्कूल विजयी
By Admin | Updated: August 5, 2014 00:15 IST2014-08-04T23:38:57+5:302014-08-05T00:15:58+5:30
मनपास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा : खेळाडूंचा अपूर्व उत्साह

नागोजीराव, जवाहर हायस्कूल विजयी
कोल्हापूर : पोलीस परेड मैदानावर आज, सोमवारी झालेल्या मनपास्तर १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत नागोजीराव पाटणकर, जवाहर, आयर्विन, न्यू इंग्लिश, राधाबाई शिंदे, भारती विद्यापीठ, हनुमान चाटे, महावीर स्कूल, चाटे, मगदूम, शिवाजी मराठा हायस्कूल यांच्यासह अन्य तीन संघांनी आगेकूच केली.
कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन राखीव पोलीस दलाचे निरीक्षक महादेव गडदे, मनपा प्राथमिक शिक्षण उपसभापती महेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेचा निकाल असा : नागोजीराव पाटणकर हायस्कूलने देशमुख हायस्कूलवर २-०ने मात केली. सिद्धेश ढेरे व पियुष शिंदेने प्रत्येकी एक गोल केला. जवाहर हायस्कूलने शाहू दयानंद हायस्कूलवर १-०ने मात केली. यामध्ये प्रथमेश माटुंगे यांनी गोल केला. आयर्विन खिश्चन हायस्कूलने कोरगावकर हायस्कूलवर २-० ने मात केली. वैभव गायकवाडने प्रत्येकी दोन गोल केले. न्यू इंग्लिश स्कूल, संभाजीनगरने जय भारत हायस्कूलवर १-० ने मात केली. यामध्ये खलील मोमीनने गोल केला. भारती विद्यापीठ हायस्कूलने प्रायव्हेट हायस्कूलवर १-० ने मात केली. सर्वेश कलागतेने गोल केला. हणमंतराव चाटे (इंग्रजी) हायस्कूलने पाटणे हायस्कूलवर टायब्रेकवर २-०ने मात केली. महावीर हायस्कूलने विमला गोयंकावर १-० ने मात केली. प्रथमेश मोरेने १ गोल केला. शिवाजी मराठा हायस्कूलने नेहरू हायस्कूलवर टायब्रेकरवर १-० ने मात केली. न्यू मॉडेलने शाहू विद्यालयावर टायब्रेकवर १-० ने मात केली. हणमंतराव चाटे (मराठी) हायस्कूलने हरिहर हायस्कूलवर २-० ने मात केली. तेजस राणे व अजिंक्य कोठारी यांनी प्रत्येकी एक गोल केला. मगदूम हायस्कूलने कोल्हापूर इंग्लिश मेडियम स्कूलवर टायब्रेकरवर मात केली. यावेळी उदय पवार, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, प्रदीप साळोखे, दिग्विजय नाईक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)