नागनाथअण्णा नायकवडी यांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST2021-07-16T04:18:11+5:302021-07-16T04:18:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सरूड : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नायकवडी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे ...

नागनाथअण्णा नायकवडी यांचे कार्य प्रेरणादायी
लोकमत न्यूज नेटवर्क
सरूड : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नायकवडी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील यांनी केले.
सरूड (ता. शाहूवाडी) येथील महात्मा गांधी विद्यालयात वारणा धरणग्रस्त आंबोळी वसाहतीच्यावतीने पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांची ९९ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात प्रारंभी क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उमेश घोलप, दत्ता पाटील, सचिन घोलप, सुशांत घोलप, विक्रम थोटपळ, शंकर पाटील, कुमार घोलप, लक्ष्मण घोलप आदी मान्यवरांसह आंबोळी वसाहतीमधील ग्रामस्थ तसेच धरणग्रस्त उपस्थित होते.