नदाफ यांचे अध्यापनाचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:48+5:302021-07-05T04:15:48+5:30
हलकर्णी : कोरोनाच्या जागतिक महामारीत शिक्षण थांबले होते, अशा परिस्थितीत इमाम हुसेन नदाफ यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन केले. ...

नदाफ यांचे अध्यापनाचे कार्य प्रेरणादायी
हलकर्णी : कोरोनाच्या जागतिक महामारीत शिक्षण थांबले होते, अशा परिस्थितीत इमाम हुसेन नदाफ यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन केले. नदाफ यांचे परिश्रम मोलाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपले काम प्रामाणिक करायचे, असे काहीसे व्यक्तिमत्त्व असलेल्या नदाफ यांचे अध्यापनाचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी एम. आय. सुतार (उर्दू विभाग) यांनी केले. हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील उर्दू विद्यामंदिरमध्ये नदाफ यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात ते बोलत होते.
अफसाना नंदिकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उर्दू विस्तार अधिकारी एम. आय. सुतार यांच्यासह चार तालुक्यांतील शाळांचे मुख्याध्यापकांनी सेवानिवृत्त शिक्षक नदाफ यांचा यथोचित सपत्नीक सत्कार केला. केंद्रप्रमुख मल्लाप्पा इंगवले, रिजवान चमन शेख, जुनेद कोल्हापुरे, फयाज ताशिलदार यांनी मनोगत व्यक्त केले.
नदाफ यांनी सत्काराबद्दल ऋण व्यक्त करून पुस्तकांसाठी १० हजार रुपये भेट दिले. सोहेल पटेल, जुनेद कोल्हापुरे, विजय कोळे, आनंद पाटील, रिजवान माणगावकर, आरिफ चौगले, मुबारक लाटकर, शबाना पटेल यांच्यासह पालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका परवीन दीडबाग यांनी आभार मानले.
फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे उर्दू विद्यामंदिरचे शिक्षक इमाम हुसैन नदाफ यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कारप्रसंगी एम. आय. सुतार, मल्लाप्पा इंगवले आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०४०७२०२१-गड-०५