शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नॅक सादरीकरणाची ठिकाणे, स्मार्ट क्लासरूमची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 11:00 AM

Shivaji University Kolhapur- राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्यावतीने (नॅक) मूल्यांकनासाठी शिवाजी विद्यापीठात दि. १५ मार्चपासून समिती येणार आहे. त्याची विद्यापीठात वेगाने तयारी सुरू आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यापीठातील विविध अधिविभागांना भेट देऊन तेथील नॅक समितीसमोर विभागाची माहिती सादर केली जाणारी ठिकाणे, स्मार्ट क्लासरूम, आदींची पाहणी केली. काही सूचनाही त्यांनी विभागप्रमुखांना केल्या.

ठळक मुद्देनॅक सादरीकरणाची ठिकाणे, स्मार्ट क्लासरूमची तपासणीकुलगुरू, प्र-कुलगुरूंकडून पाहणी : विविध विभागांचा आढावा

कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्यावतीने (नॅक) मूल्यांकनासाठी शिवाजी विद्यापीठात दि. १५ मार्चपासून समिती येणार आहे. त्याची विद्यापीठात वेगाने तयारी सुरू आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यापीठातील विविध अधिविभागांना भेट देऊन तेथील नॅक समितीसमोर विभागाची माहिती सादर केली जाणारी ठिकाणे, स्मार्ट क्लासरूम, आदींची पाहणी केली. काही सूचनाही त्यांनी विभागप्रमुखांना केल्या.ह्यनॅकह्य तयारीअंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या तयारीचा आढावा सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने घेण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून कुलगुरू डॉ. शिर्के आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत यांनी मानव्यशास्त्र इमारत, वि. स. खांडेकर भाषा‌भवनमधील विविध अधिविभाग, तर विद्यार्थी भवनाला भेट दिली. प्र-कुलगुरू डॉ. पाटील आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी विज्ञान विद्याशाखेशी संबंधित अधिविभागांना भेटी दिल्या.

या विभागांमधील स्मार्ट क्लासरूम सुरू आहेत का?, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेणाऱ्या सुविधांची व्यवस्था, सादरीकरणाच्या ठिकाणांवरील स्थिती, रंगरंगोटी व डागडुजी, साधनसामग्री, आदींची तपासणी केली. सोशल डिस्टन्सिंग, साफसफाई, नॅक समितीसमोर सादरीकरणाबाबतच्या काही सूचना यावेळी विभागप्रमुखांना करण्यात आल्या. सायंकाळी सहापर्यंत ही पाहणी सुरू होती. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर