सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयास नॅक समितीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:46+5:302021-02-23T04:37:46+5:30
देशभरातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढ व मूल्यांकनासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद, बंगलोरच्या (नॅक)मार्फत ...

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयास नॅक समितीची भेट
देशभरातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढ व मूल्यांकनासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद, बंगलोरच्या (नॅक)मार्फत देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांचे त्यांनी पाठविलेले वार्षिक अहवाल व स्वयंअभ्यास अहवालाच्या आधारे सर्वंकष तपासणी करते. त्या उद्देशाने एक उच्चस्तरीय समिती महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन दर्जा निश्चिती करते. याच अनुषंगाने मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयास या समितीने भेट दिली. उच्चस्तरीय भेट यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली नॅक सेल समन्वयक डॉ. उदय शिंदे व आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. अद्वैत जोशी, उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील व सर्व प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले. यासाठी जय शिवराय एज्यु. सोसा.चे सेक्रेटरी खासदार प्रा. संजय मंडलिक, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र मंडलिक, संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, कार्यवाह अण्णासो थोरवत यांचे मागदर्शन लाभले.
फोटो ओळ - कुलगुरू डॉ. अब्दुलखादेर यांच्याकडून अहवाल स्वीकारताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, समन्वयक डॉ. उदय शिंदे, आयक्यूएसीचे डॉ. अद्वैत जोशी, समितीचे सर्व सदस्य, उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील व कार्यवाह आण्णासो थोरवत उपस्थित होते.