माय-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू

By Admin | Updated: November 2, 2014 00:39 IST2014-11-02T00:39:24+5:302014-11-02T00:39:24+5:30

हृदयद्रावक घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ

Myel Lake drowns in the well | माय-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू

माय-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू

 
गडहिंग्लज : वीस वर्षीय विवाहितेसह दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला. उज्ज्वला अरुण सावंत (वय २०) व अमृता अरुण सावंत (वय १ वर्षे ६ महिने, रा. चन्नेकुप्पी, ता. गडहिंग्लज) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जरळी-चन्नेकुप्पी मार्गावरील दरेकर वसाहतीमध्ये सावंत कुटुंबीय राहतात. त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या समाईक विहिरीच्या काठावर मोबाईल, तर विहिरीच्या पाण्यात साडीच्या कापडाचा तुकडा तरंगताना सकाळी आढळून आला. त्यामुळे घरच्या मंडळींना संशय आला.
विहीर तुडुंब भरल्यामुळे जरळीतील बागडी समाजातील पाणक्यांना बोलावण्यात आले. त्यांनी पाण्यात शोध घेतला असता, हा प्रकार उघडकीस आला. विहिरीतील पाणी उपसून सायंकाळी दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यावेळी उज्ज्वलाच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी डीवाय एस.पी. सागर पाटील व पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना भेट दिली. गुन्ह्याच्या नोंदीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
लेकीला पोटाशी बांधले
उज्ज्वला हिने अमृताला कापडाने पोटाशी घट्ट बांधून घेतले होते. झोपलेल्या स्थितीतील मूल आईच्या पोटाशी बिलगलेले चित्र मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली.
आत्महत्या की घातपात?
उज्ज्वला हिने विहिरीत उडी घेऊन लेकीसह आत्महत्या केली, की त्यांचा घातपात झाला हे पोलीस तपासातच स्पष्ट होणार आहे. मात्र लग्नानंतर अल्पावधितच तिने अशाप्रकारे आपली जीवनयात्रा संपवली याचे गूढ कायम आहे.

Web Title: Myel Lake drowns in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.