कोल्हापूर माझी आई : सुलोचना

By Admin | Updated: June 1, 2015 00:51 IST2015-06-01T00:45:49+5:302015-06-01T00:51:44+5:30

पोस्टर्स अन् कलाकारांची प्रसिद्धी

My mother of Kolhapur: Sulochana | कोल्हापूर माझी आई : सुलोचना

कोल्हापूर माझी आई : सुलोचना

कोल्हापूर : आज जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व जरी हरवले असले तरी, मला अभिनेत्री म्हणून ओळख ‘जयप्रभा’च्या सावलीतच मिळाली. मी पडद्यावर आईच्या भूमिका सक्षमपणे साकारल्या असल्या तरी माझ्या पाठीशी खंबीरप्रमाणे उभे राहणारे कोल्हापूर हे माझी आईच आहे. कोल्हापूर, भालजी पेंढारकर यांना मी कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत अभिनेत्री सुलोचना यांनी कोल्हापूरबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. चित्रकार रियाज शेख यांच्या संग्रहातील सिनेपोस्टरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी सुलोचना यांच्या हस्ते झाले. यानंतर कलाप्रेमींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शेख यांच्या संग्रहातील सिनेपोस्टरांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये १९२१ ते ७० च्या दशकांतील सिनेपोस्टर मांडली असून हे प्रदर्शन ६ जूनपर्यंत खुले आहे. यामध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ या सिनेमाचे पोस्टर आहे. पहिला बोलपट आलमआरा, वक्त, मदर इंडिया, कल्याण खजिना, होमी वाडिया यांचे स्टंटपट आहेत. याशिवाय शिवाजी महाराज, राणी येसूबाई यांसह मराठी-हिंदीमधील गाजलेल्या सिनेमांची पोस्टर्स या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.
अध्यक्षस्थानी चंद्रकांत जोशी होते. याप्रसंगी राजा उपळेकर, एस. निंबाळकर, संजय शेलार, शांता तांबे, सुभाष भुर्के, आदी उपस्थित होते. रियाज शेख यांनी प्रास्ताविक केले.
पोस्टर्स अन् कलाकारांची प्रसिद्धी
यावेळी कलाप्रेमींशी संवाद साधताना सुलोचना यांनी तत्कालीन सिनेजगतातील पोस्टर्सचे इंगित उलगडले. त्यावेळी पोस्टर्सवर कलाकाराची छबी झळकली की तो स्टार झाला, अशी समजूत असायची. आजही त्यावेळी पोस्टर पाहायला होणारी गर्दी डोळ्यांसमोरून हटत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: My mother of Kolhapur: Sulochana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.