शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

swapnil kusale: माझे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही, सुवर्ण जिंकणारच; स्वप्निलचा कोल्हापूरकरांना शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:34 IST

कोल्हापूर : ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले असले तरी माझे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हेच माझे स्वप्न असून, ...

कोल्हापूर : ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले असले तरी माझे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हेच माझे स्वप्न असून, तुमच्या सर्वांच्या साथीने हे पदक मी जिंकणारच, असा शब्द ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळे याने बुधवारी ऐतिहासिक दसरा चाैकात कोल्हापुरवासियांना दिला.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये कांस्यपदक मिळाल्याबद्दल प्रथमच ते कोल्हापुरात आले. त्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे भव्य सत्कार झाला. ताराराणी चौकातून भव्य मिरवणुकीने दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राजर्षी शाहू स्मारक भवनात स्वप्नीलने पत्रकारांशी संवाद साधला.कोल्हापूर खरोखरच क्रीडानगरी आहे. कोल्हापूरकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे, त्यांच्या पाठिंब्यामुळे आणखी प्रेरणा मिळाली आहे, असे सांगून स्वप्नील म्हणाला, हे एक माझ्या एकटयाचे यश नाही. ऑलिम्पिकपर्यंत जाण्यासाठी सर्वच घटकांनी मला मोलाची मदत केली. प्रेरणा, ताकद दिली. त्यामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो. सातव्या क्रमांकापासून ते तिसऱ्या क्रमाकांपर्यंत येईपर्यंत मनाची खूप धाकधूक होती. मात्र खेळात घाबरुन चालत नाही. हृदयाचे ठोकेही वाढवून चालत नाही. खेळात कसे शांत राहयचे, कसे खेळायचे हे मी माझ्या वरिष्ठांकडून शिकलो. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा चांगला फायदा झाला. पत्रकार परिषदेला स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे, भाऊ सूरज कुसाळे, प्रशिक्षक दीपाली देशपांडे, अक्षय अष्टपुत्रे, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते.

स्वप्नील शिस्तप्रिय खेळाडूप्रशिक्षक दीपाली देशपांडे म्हणाल्या, स्वप्नील शिस्तप्रिय खेळाडू आहे. पहाटे साडेपाच वाजता प्रशिक्षणासाठी हजर राहायचा. ध्येयासाठी तो कधीही बाजूला गेला नाही. त्याने एक वर्ष आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले. फक्त ज्युनिअर प्रशिक्षण कालावधीत खेळाडूंचा सामना दुपारी होता. त्या वेळी आमची प्रशिक्षणार्थी खेळाडू सकाळी झोपली होती. नेमबाजीत अति झोप चालत नाही. त्याचा खेळावर परिणाम होतो. त्यामुळे प्रशिक्षण कालावधीत स्वप्नीलला ओरडण्याची एकदाच वेळ आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४swapnil kusaleस्वप्नील कुसाळे