हातकणंगलेतून माझीच शिवसेनेकडून उमेदवारी

By Admin | Updated: July 18, 2014 00:51 IST2014-07-18T00:47:09+5:302014-07-18T00:51:04+5:30

सुजित मिणचेकर यांचा दावा

My candidature from Shiv Sena from Hathkangale | हातकणंगलेतून माझीच शिवसेनेकडून उमेदवारी

हातकणंगलेतून माझीच शिवसेनेकडून उमेदवारी

आळते : कोणी शिवसेनेत प्रवेश करतो आणि त्याला उमेदवारी मिळणार असे होत नाही. येत्या निवडणुकीतही माझीच उमेदवारी असणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच ही भूमिका जाहीर केली आहे, असे प्रतिपादन आमदार सुजित मिणचेकर यांनी पत्रकार बैठकीत केले.मिणचेकर म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना मताधिक्य देण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळाली, असे होत नाही. विद्यमान आमदारांनाच उमेदवारी देण्याचे उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याने संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांनी माझी उमेदवारी जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संजय चौगुले, बाबासो शिंगे, मोहन कोळेकर, सागर पाटील, धोंडिराम कोरवी, प्रताप पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: My candidature from Shiv Sena from Hathkangale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.