आसगावकर यांनी घेतली मुश्रीफ, पी. एन. यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:19 IST2020-12-07T04:19:23+5:302020-12-07T04:19:23+5:30
काेल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातील नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी रविवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पी. ...

आसगावकर यांनी घेतली मुश्रीफ, पी. एन. यांची भेट
काेल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातील नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी रविवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेतली.
आमदार आसगावकर यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर शनिवारी (दि. ५) सायंकाळी ते कोल्हापुरात आले. रविवारी सकाळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील संस्थाचालक व नेत्यांची भेट घेतली. दुपारच्या टप्प्यात शासकीय विश्रामगृहात जाऊन त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचीही भेट घेऊन त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यांच्यासमवेत पांडुरंग विकास संस्थेचे माजी अध्यक्ष कृष्णात चाबूक, प्रल्हाद खाडे, आदी हाेते.
फोटो ओळी : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी रविवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी गुलाबराव घोरपडे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. (फोटो-०६१२२०२०-कोल-आसगावकर०१) (छाया- राज मकानदार)
- राजाराम लोंढे