शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

मुश्रीफ-केपींना स्वत:च्या राजकारणाचीच काळजी

By admin | Updated: April 8, 2015 00:58 IST

‘गोकुळ’चे रणांगण : पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये ही दक्षता; आता स्वतंत्र पॅनेलशिवाय पर्याय नाही

कोल्हापूर : पक्षाचे धोरण अथवा कार्यकर्त्यांना बळ देण्याचे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वत:चे राजकारण कसे सुरक्षित होईल यासाठी दबावतंत्र म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचा वापर करत आहेत. आता नाक दाबल्यामुळेच त्यांना स्वतंत्र पॅनेल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने तशा हालचाली सुरू केल्या आहेत. कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसवर आमदार हसन मुश्रीफ यांची पकड आहे. त्यामुळे ते जी भूमिका घेतील तीच पक्षाची भूमिका असेल. परवा झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात मुश्रीफ यांनी पाठिंबा देण्याबाबत अथवा विरोध करण्याबाबत कोणतीच उघड भूमिका घेतली नाही. माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील आदींनी सत्तारुढ आघाडीला पाठिंबा द्यावा, असा आग्रह धरला. मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीत ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील यांची मदत झाली. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यापुरताच मुश्रीफ यांना या निवडणुकीत रस आहे. रणजित पाटील गटाचे पाठबळ हे कागल तालुक्याच्या राजकारणातील हसन मुश्रीफ यांची अपरिहार्यता आहे. रणजित पाटील हे काय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हेत. खासगीत ते आपण राष्ट्रवादी पक्षाच्या जन्माअगोदरपासून ‘गोकुळ’मध्ये संचालक असल्याचे सांगतात. शिवाय मुश्रीफ यांनी वजन वापरले अथवा नाही वापरले तरी त्यावरून त्यांची उमेदवारी ठरत नाही. कारण त्यांची ‘ज्येष्ठ संचालक’ म्हणून ‘गोकुळ’च्या राजकारणात स्वतंत्र ताकद आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी त्यांच्यासाठी आग्रह हा विधानसभेतील मदतीची परतफेड एवढ्यापुरताच मर्यादित आहे. हसन मुश्रीफ हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पॅनेलमध्ये संधी द्या, असा आग्रह धरण्यापेक्षा ते संजय घाटगे गटाला ‘गोकुळ’मध्ये घेऊ नका म्हणून पक्षाची ताकद वापरत आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांना विधानसभा निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांच्यामुळे माजी आमदार बजरंग देसाई गटाने मदत केली परंतु तरीही ते पराभवाची त्सुनामी टाळू शकले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यादृष्टीने बिद्री साखर कारखान्याची सत्ता टिकविणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांना आमदार महादेवराव महाडिक यांची रसद हवी आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या राजकारणात महाडिक यांना दुखावण्याची त्यांची अजिबात तयारी नाही. (प्रतिनिधी)जावई माझा भला...‘बिद्री’च्या निवडणुकीत आमदार महाडिक के.पी. यांच्या मागे राहतील आणि माजी आमदार पी. एन. पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागे असतील. कारण ‘भोगावती‘च्या निवडणुकीवरून के.पी.-मुश्रीफ यांच्याशी पी. एन. यांचा संघर्ष आहे. आता पी. एन. व महाडिक ‘गोकुळ’मध्ये एकत्र असले तरी ‘भोगावती’त मात्र महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसलाच मदत करणार, हे देखील नक्की आहे. तिथे पुन्हा के. पी. यांचेच जावई सत्तेत आहेत. त्यामुळे महाडिक यांच्या पाठिंब्याची किंमत ही के. पी. यांच्यादृष्टीने जास्त आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार करून ‘गोकुळ’मध्ये मिळाली तर एखादी जागा पदरात पाडून घ्यावी, नाही तर महाडिक यांच्याशी जमवून घ्यावे व जी सत्ता हातात आहे, ती कशी कायम राहील यासाठी ते धडपड करत आहेत. ‘गोकुळ’ का नको..‘गोकुळ’चा संचालक म्हणजे चार-दोन गावांत प्रभाव पाडू शकणारा नेता शिवाय आर्थिक रसदही. त्यामुळे आपल्याच तालुक्यातच पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये, असे या नेत्यांना वाटते. कागलसारख्या चुरशीच्या लढतीत तर अशा संचालकांचे महत्त्व फारच वाटते. विधानसभेला मुश्रीफ यांना रणजित पाटील यांच्या किती नाकदुऱ्या काढाव्या लागतात हा अनुभव आहेच. त्यामुळे दिलीच तर के.पी. यांच्या मुलाला संधी द्या, अशीच या दोघा नेत्यांची मागणी होती.