मुश्रीफ फौंडेशन सर्वसामान्यांच्या नेहमीच पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:46+5:302021-08-20T04:28:46+5:30
मुरगूडमध्ये साहित्य वितरण मुरगूड : जिल्ह्यात कोणत्याही सर्वसामान्य माणसावर कसलेही संकट आले तर मदतीसाठी मुश्रीफ फौंडेशन नेहमीच तत्पर ...

मुश्रीफ फौंडेशन सर्वसामान्यांच्या नेहमीच पाठीशी
मुरगूडमध्ये साहित्य वितरण
मुरगूड :
जिल्ह्यात कोणत्याही सर्वसामान्य माणसावर कसलेही संकट आले तर मदतीसाठी मुश्रीफ फौंडेशन नेहमीच तत्पर असते. आम्हाला जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे त्याच्या उतराईत राहण्यासाठी भविष्यातही मुश्रीफ फौंडेशन सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास ‘गोकुळ’चे संचालक नविद मुश्रीफ यांनी दिला.
मुरगूडमध्ये विविध नागरिकांना फौंडेशनच्या वतीने साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डी. डी. चौगले होते. स्वागत प्रास्ताविक मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांनी केले, तर आभार सुनील चौगले यांनी मानले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, माजी उपनगराध्यक्ष शामराव घाटगे, दिग्विजय पाटील, संजय गांधी निराधार समिती सदस्य राजू आमते, सरपंच देवानंद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीलेश शिंदे, नगरसेवक रविराज परीट, गणपती मांगोरे, लक्ष्मण चौगुले, शाहू फर्नांडिस, नंदकिशोर खराडे, संजय सूर्यवंशी, विकी बोरगावे, निवृत्ती हसबे आदी प्रमुख उपस्थित होते.
१९ मुरगूड नावेद मुश्रीफ
फोटो ओळ
मुरगूड, ता. कागल येथे मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने विविध साहित्य वितरित नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डी. डी.चौगले, दिग्विजय पाटील, रणजित सूर्यवंशी, शामराव घाटगे, सुनील चौगले आदी उपस्थित होते.