आंबेओहळ प्रकल्प लाभार्थींकडून मुश्रीफांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:21+5:302021-06-20T04:17:21+5:30

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले की, पुनर्वसन व तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ ...

Mushrif felicitated by Ambeohal project beneficiaries | आंबेओहळ प्रकल्प लाभार्थींकडून मुश्रीफांचा सत्कार

आंबेओहळ प्रकल्प लाभार्थींकडून मुश्रीफांचा सत्कार

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले की, पुनर्वसन व तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ झाला असला तरी उत्तूर विभागासह कडगाव-गिजवणे विभागाच्या शेती, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघणार आहे. सदानंद पाटील म्हणाले, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करून शब्द पाळला आहे. या वेळी काशिनाथ तेली, माजी सभापती शिरीष देसाई, आजरा कारखान्याचे संचालक मारुतराव घोरपडे, विजय वांगणेकर, शशिकांत लोखंडे, दशरथ पावले, आनंदा बाबर, माजी सभापती बाळासाहेब देसाई, सदानंद पाटील, संग्राम घाटगे, आकाराम पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

चौकट

फोटो ओळी - आंबेओहळ प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच साठलेल्या पाण्यामुळे आनंदित झालेल्या कडगाव - गिजवणे व उत्तूर विभागातील शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार केला.

Web Title: Mushrif felicitated by Ambeohal project beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.