म्हाकवेत अंतर्गत वादाने मुश्रीफ गटाची सत्ता पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:40+5:302021-01-23T04:24:40+5:30
म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील अंतर्गत वादामुळे मुश्रीफ गटाने एकहाती असणारी सत्ता गमावली आहे. ...

म्हाकवेत अंतर्गत वादाने मुश्रीफ गटाची सत्ता पायउतार
म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील अंतर्गत वादामुळे मुश्रीफ गटाने एकहाती असणारी सत्ता गमावली आहे. मंडलिक गट सोबत असतानाही पराभवाला सामोरे जावे लागले, तर दोन्ही घाटगे गटाने अत्यंत नियोजनबद्ध व्यूहरचना करून ती यशस्वी केल्याने येथे सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना सत्तेत आली. १३ पैकी ७ जागा घाटगे गटाला, मंडलिक-मुश्रीफ गटाला ६ जागा. तर तिसऱ्या आघाडीला खातेही उघडता आले नाही.
एकाच गटाकडे सत्ता न देता सत्तांतर करण्याचा जनतेचा निर्धार यावेळीही कायम राहिला. निवडणूक तिरंगी झाली असली तरी खरी लढत जुन्या मंडलिक-घाटगे गटातच झाली. मुश्रीफ गटाला अंतर्गत वाद भोवला असून मतविभागणी होऊन पराभवाला सामोरे जावे लागले.
माजी पं. स. सदस्य ए. वाय. पाटील, ए. टी. पाटील, पी. डी. चौगुले, धनंजय पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, विलास पाटील यांनी रणनीती आखून सत्तांतराचा मार्ग सुकर केला. सदासाखरचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले यांच्या मदतीने सत्ता अबाधित राखण्यासाठी रमेश पाटील, महिपती पाटील, एकनाथ पाटील, दिनेश पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तिसऱ्या आघाडीकडून शिवानंद माळी, वर्षा पाटील, सदाशिव गोरे यांनी परिश्रम घेतले.
मुश्रीफांनाही वाद मिटविण्यात अपयश...
म्हाकवे येथील वाद मिटविण्यात मंत्री मुश्रीफ यांनाही यश आले नाही. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी काही नाराजांना घेऊन केलेल्या तिसऱ्या आघाडीने प्रत्येक वाॅर्डात ५३ पासून २०२ पर्यंत मते घेतली.
असाही योगायोग...
गतवेळी माजी उपसभापती सिद्राम गंगाधरे यांचा भारत लोहार यांनी पराभव केला होता, तर या निवडणुकीत त्यांचे चुलत बंधू रणजित लोहार या नवख्या युवकाने माजी जि. प. सदस्य माळी यांना पराभूत केले.