शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

तीन जागांची ऑफर मुश्रीफ, सतेज पाटील यांनी फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:28 IST

Gokul Milk Kolhapur-गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीन जागांची केलेली ऑफरच एकसंध होण्याच्या चर्चेला पूर्णविराम देणारी ठरली आहे. मंत्री पाटील यांच्या गटाकडून सोमवारी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या तर आपल्या हिमतीवर लढण्याची भूमिका घ्यावी, असा आग्रह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून झाल्याने गोकुळच्या मैदानात पी. एन.-महाडीक व मुश्रीफ-सतेज पाटील असाच सामना होणार, हे निश्चित झाले.

ठळक मुद्देतीन जागांची ऑफर मुश्रीफ, सतेज पाटील यांनी फेटाळली दोन्ही गटात संतप्त प्रतिक्रिया

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीन जागांची केलेली ऑफरच एकसंध होण्याच्या चर्चेला पूर्णविराम देणारी ठरली आहे. मंत्री पाटील यांच्या गटाकडून सोमवारी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या तर आपल्या हिमतीवर लढण्याची भूमिका घ्यावी, असा आग्रह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून झाल्याने गोकुळच्या मैदानात पी. एन.-महाडीक व मुश्रीफ-सतेज पाटील असाच सामना होणार, हे निश्चित झाले.गोकुळमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडीक यांनी एकत्रित यावे, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच मंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील व आमदार पाटील यांची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर रविवारी जिल्हा बँकेत मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांची बैठक झाली.

यामध्ये जागांवर चर्चा होऊन राष्ट्रवादीला दोन तर मंत्री पाटील यांना एक जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला. यावरून मंत्री पाटील यांच्या गटात सोमवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मागील निवडणुकीत मंत्री पाटील यांनी अठरा जागा लढवून त्यातील दोन जागा जिंकल्या होत्या. त्यात गेली पाच वर्षे त्यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी केल्याने ते सुरुवातीपासूनच तडजोडीला तयार नाहीत.

मंत्री मुश्रीफ यांनी मागील निवडणुकीत एक जागा घेऊन सत्तारूढ गटाला साथ दिल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज होते. पुन्हा दोन जागा घेऊन तडजोड केली तर पक्षामध्ये असंतोष निर्माण होईल, यापेक्षा स्वत:च्या हिमतीवरच लढवण्याची मानसिकता मंत्री मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची दिसते.मनपाचे कर प्रकरण चर्चेतील अडथळामहापालिकेच्या कर आकारणीवरून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर कदम बंधूने केलेले आरोप, त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनाही ओढले. हेच गोकुळच्या तडजोडीतील अडथळा ठरल्याची चर्चा सुरू आहे.मी नाही, तुम्ही निर्णय घ्या....सत्तारूढ गटाने दिलेल्या ऑफरवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिसाद दिला नसला तरी त्यांनी मी नाही, तुम्ही निर्णय घ्या, असा निरोप मंत्री मुश्रीफ यांना दिल्याचे समजते.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर