शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
4
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
5
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
6
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
7
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
8
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
9
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
11
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
12
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
13
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
14
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
15
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
16
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
17
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
18
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
19
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
20
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

‘मस्क्युलर डिस्ट्राफी’ने खेळत्या-बागडत्यांचे आयुष्य उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 01:24 IST

लहानपणी ‘चाल चाल’ करत आपल्या चालीने चालणारी मुलं कधी बदकासारखी चालायला लागतात कळत नाही. जेव्हा हे कळते तेव्हा पालकांना जबरदस्त धक्का बसतो. कारण या मुलाला ‘मस्क्युलर डिस्ट्राफी’ झाल्याचे निदान होते. या आजारावर सध्या तरी शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात अशी ८०० मुले, मुली असल्याची आकडेवारी आहे. माहिती नसलेला हा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या पालकांच्या अस्वस्थतेचा आढावा या मालिकेद्वारे...

ठळक मुद्देपालक हवालदिल : शासकीय दवाखान्यांमध्येही उपचार नाहीत जीवघेणा मस्क्युलर डिस्ट्राफी

समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापूर येथील कुलकर्णी यांच्या लग्नाला १० वर्षे झाली होती. दहा वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला. कौतुकाचा अभिषेक होऊ लागला. त्याचे नावही ठेवले गेले अभिषेक. त्याच्या बाललीला पाहण्यात कुटुंबाचे दिवस सरत होते. आता तो चालायला लागला होता. परंतु मध्येच पडतही होता. त्याला उठताना त्रास होत होता. त्याच्या पिंढऱ्या सुजू लागल्या. तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी सांगितले, त्याला ‘ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्राफी’ हा आजार झाला आहे.आज वयाच्या १८व्या वर्षीही अभिषेक व्हेंटिलेटरवर जगण्याचा संघर्ष करतो आहे. कारण त्याच्या फुफ्फुस आणि हृदयाच्या स्नायूतील शक्ती कमी झाली आहे. आई-वडील नोकरी करत, तडजोडी करत, खर्च करत त्याला जगवण्यासाठी धडपडत आहेत.

सोलापूर येथील आरोग्य खात्यात काम करणाºया एक महिला कर्मचारी आहेत. त्यांचा मुलगाही याच आजाराने गेल्या तीन महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. त्यांना भविष्यात नेमके काय होणार आहे याची जाणीव आहे. परंतु मुलाची ही अवस्था पाहून वडिलांनी मदत करण्याऐवजी पत्नी आणि मुलापासूनच दूर राहण्याचा निर्णय घेतला. अशी अनेक उदाहरणे आहेत की जी मुलांना झालेल्या या ‘ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्राफी’ या आजारामुळे अखंड घरंच उद्ध्वस्त झाली आहेत.या आजाराची लक्षणे स्नायूंशी संबंधित असा हा आजार आहे. ज्यामध्ये मुलांच्या स्नायूंतील ताकद हळूहळू कमी होत जाते. अखेर स्नायू निकामी होतात.

हा आजार प्रामुख्याने मुलांमध्ये आढळतो. १०० पैकी ८ मुलींना तो होण्याची शक्यता असते. आपले सर्व शरीर स्नायूंनी व्यापले आहे आणि हा आजार एकाही स्नायूला सोडत नाही. सुरुवातीला ही मुले इतर मुलांप्रमाणे निरोगीच दिसतात. हळूहळू अशा मुलांची वाढ मंद होऊ लागते. ती बदकासारखी चालायला लागतात. तोल जावून पडायला लागतात. उठायला मदत किंवा आधार घ्यावा लागतो. पायºया उतरणे, चढणे अवघड होते. पिंढऱ्यांचा फुगीरपणा खूपच वाढतो. मणक्यांमध्ये एका बाजुला कमान तयार होते.

मुलं टाचा उंच करून केवळ पायाच्या चम्प्यावर मुश्किलीने चालतात. थोड्याच दिवसांत व्हीलचेअरला पर्याय राहात नाही. बुद्धी चांगली असून, परावलंबी असल्याने शाळेत जाता येत नाही. वयाच्या १५ ते २० वर्षांपर्यंत असंख्य वेदना सहन करत त्यांना जगावे लागते. अगदी मरण येईपर्यंत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल