शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘जलयुक्त’मधील मुरुम, माती आता रस्त्यांसाठी, कोल्हापूर जिल्ह्यात लवकरच अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:54 IST

‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून उचलला जाणारा गाळ, माती, मुरुम व दगड रस्ते आणि महामार्गाच्या कामांसाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा लाभ जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही खात्यांना होणार आहे. जिल्ह्यात याबाबत लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे‘जलयुक्त’मधील मुरुम, माती आता रस्त्यांसाठीजलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभागाला होणार लाभ

प्रवीण देसाई

कोल्हापूर : ‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून उचलला जाणारा गाळ, माती, मुरुम व दगड रस्ते आणि महामार्गाच्या कामांसाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा लाभ जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही खात्यांना होणार आहे. जिल्ह्यात याबाबत लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राज्यभरात नाला खोलीकरण, रुंदीकरण, पाझर तलाव, साठवण तलावातून गाळ काढणे, शेततळ्यांची निर्मिती करणे अशी विविध कामे सुरू आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात रस्ते आणि महामार्गांचीही कामेही सुरू आहेत. रस्ते आणि महामार्गाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या मुरुम, माती, दगड, आदी गौण खनिजांचा तुटवडा जाणवत आहे.

त्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभागाची सांगड घालून ‘जलयुक्त’अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये उपलब्ध होणारी मुरुम, माती, दगड, आदी सरकारकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.

या निर्णयानुसार कंत्राटदारांकडून स्वामित्वधन व अर्जशुल्क घेण्यात येणार नाही; परंतु खोदकामाच्या ठिकाणापासून प्रकल्पस्थळापर्यंत रस्ता उपलब्ध नसेल तर संबंधिताला रस्ता बनवून घ्यावा लागेल. जिल्हास्तरावर याची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ‘जलयुक्त शिवार’मधून कामे झाली आहेत. त्याचबरोबर इथून पुढेही अनेक कामांना सुरुवात होणार आहेत. त्यामुळे गौण खनिज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.

शासनाच्या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला ‘जलसंधारण’च्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

अशी होणार अंमलबजावणी

  1. - फक्त रस्त्यांच्या कामांसाठीच माती, मुरुम, दगड यांचा वापर करता येणार आहे.
  2. - रस्त्यांच्या कामासाठी उचललेली माती, मुरुमाची अन्य ठिकाणी विक्री करता येणार नाही.
  3. - रस्त्याच्या कामांसाठी विनामूल्य मुरुम, माती दिली जाणार आहे.
  4. - उत्खननात वाळू उपलब्ध झाल्यास वाळू उपसा करता येणार नाही.
  5. - क्षेत्रीय महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जागेची मोजणी करून सीमांकन केले जाणार.
  6. - सीमांकनाबाहेरील जागेचे खोदकाम केल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई होणार.
  7. - मंजुरीपेक्षा जादा खोदकाम करता येणार नाही.

 

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत काढण्यात येणारा गाळ, मुरुम, माती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी वापरावी, असा शासन निर्णय झाला आहे. याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय होऊन त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल.- बसवराज मास्तोळी,जिल्हा कृषी अधीक्षक

 

शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप काही निर्देश आलेले नाहीत. शासनाकडून याबाबत मार्गदर्शन आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.- सदाशिव साळुंखे,अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर