गोकुळच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मुरलीधर जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:14+5:302021-07-18T04:18:14+5:30

बांबवडे : डोणोली तालुका शाहूवाडी येथे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव ...

Murlidhar Jadhav felicitated for being elected as Gokul's director | गोकुळच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मुरलीधर जाधव यांचा सत्कार

गोकुळच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मुरलीधर जाधव यांचा सत्कार

बांबवडे : डोणोली तालुका शाहूवाडी येथे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना शाखा डोणोलीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी प्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, या निवडीबद्दल माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले. शाखाप्रमुख निवास निकम यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

या वेळी प्रदीप शेळके, रवींद्र चौगुले, रवींद्र पाटील, विनोद शेळके, विशाल पाटील, पंडित शेळके, दीपक कुंभार, विलास शेळके, भालचंद्र शेळके, बिरदेव जानकर, आदर्श पाटील, जगन्नाथ तोडकर इत्यादी उपस्थित होते.

फोटो- डोणोली येथे मुरलीधर जाधव यांचा सत्कार करताना शिवसैनिक.

Web Title: Murlidhar Jadhav felicitated for being elected as Gokul's director