मुरगुडच्या नेहाची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST2021-06-22T04:17:11+5:302021-06-22T04:17:11+5:30

दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत नेहाने नेत्रदीपक कामगिरी केली. ४९ किलो वजन गटामध्ये ...

Murgud's Neha selected for World Wrestling Championship | मुरगुडच्या नेहाची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगुडच्या नेहाची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत नेहाने नेत्रदीपक कामगिरी केली. ४९ किलो वजन गटामध्ये तिने पंजाबच्या मनप्रीतला तब्बल दहा-शून्य गुणांनी पराभूत केले, तर दुसऱ्या फेरीत हरयाणाची आंतरराष्ट्रीय पदक विजेती मल्ल आरती हिला चार-दोन अशा गुण फरकाने पराभूत केले. मुलींमधून महाराष्ट्रातून एकमेव नेहाची निवड झाली आहे. निवडीची बातमी समजताच नेहाच्या नातेवाइकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आंनद व्यक्त केला.

नेहा मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुलामध्ये सराव करते. तिला एनआयएस कुस्ती प्रशिक्षक दादादो लवटे, सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले, तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे-कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ, कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी, खासदार संजय मंडलिक, वीरेंद्र मंडलिक, चंद्रकांत चव्हाण, किरण चौगले यांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Murgud's Neha selected for World Wrestling Championship