मुरगूड मोर्चा बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:27+5:302021-08-22T04:27:27+5:30

चौकट महिलांचा आक्रोश काळीज पिळवटणारा आज दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे कडक उन्हात भररस्त्यावर महिलांनी ठाण मांडले होते. ...

Murgud Morcha News Add | मुरगूड मोर्चा बातमी जोड

मुरगूड मोर्चा बातमी जोड

चौकट

महिलांचा आक्रोश काळीज पिळवटणारा

आज दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे कडक उन्हात भररस्त्यावर महिलांनी ठाण मांडले होते. अनेक महिला रडत रडत आपल्या भावना व्यक्त करत होत्या. त्यात अनेक वृद्ध महिलांना भोवळ आली. त्यांना तत्काळ सावलीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण तिथेसुद्धा त्या आक्रोश करत होत्या. सुरुवातीला पोलिसांना इतक्या मोठ्या संख्येने ग्रामस्थ येतील, अशी अपेक्षा नव्हती, पण अचानक दोन्ही गावांतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ आल्याने आणि त्यांच्याबरोबर शहरातील व परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशन समोर आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कोर्टात गेलेले सपोनि विकास बडवे हे तत्काळ परत मुरगूडला आले. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधून शंभर पोलीस घटनास्थळी आले. सशस्त्र बंदूकधारी फोर्सही तत्काळ आली आणि सर्वच अधिकाऱ्यांनी समजुतीची भूमिका घेत ग्रामस्थांना आपली भूमिका पटवून दिल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

Web Title: Murgud Morcha News Add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.