अनैतिक संबंधातून युवकावर खुनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST2020-12-05T04:51:32+5:302020-12-05T04:51:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : आसरानगर येथील एकावर अनैतिक संबंधातून खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये नागेश सुरेश यमुल (वय ...

अनैतिक संबंधातून युवकावर खुनी हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : आसरानगर येथील एकावर अनैतिक संबंधातून खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये नागेश सुरेश यमुल (वय ३५, रा. लाखेनगर) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
राहुल विनोद पाथरवट (वय १९, रा. साईट नं. १०२, इचलकरंजी), नागेश शिवाप्पा हिरीकुरभुर ऊर्फ पुजारी (२१, रा. पाटील मळा, इचलकरंजी) व सुप्रिया ऊर्फ छकुली पांडु वाघमारे (२१, रा. आसरानगर गल्ली नं.६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, लाखेनगरमध्ये राहणारा नागेश व आसरानगर गल्ली नं. ६ मध्ये पतीसह भाड्याने राहणाऱ्या सुप्रिया यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. यामुळे नागेश याचे सुप्रिया हिच्या घरी येणे-जाणे होते. मंगळवारी (दि. १) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नागेश हा सुप्रिया हिच्या घरी गेला होता. तेथून बाहेर पडत असताना राहुल व त्याचा मित्र हिरीकुरभुर या दोघांनी नागेशवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात नागेशच्या डोक्यात, हातावर व चेहऱ्यावर वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत घरात कोंडून संशयितांनी पलायन केले.
कोंडून घातल्याने नागेश तासभर रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडला होता. ही माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन त्यास रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, जयसिंगपूरचे रामेश्वर वैजंने, आदींनी भेट दिली.
चौकट -
काही तासांतच संशयितांना अटक
घटना घडल्यानंतर पोलिसांची दोन पथके तिघा संशयितांच्या शोधासाठी रवाना केली होती. मोबाईल लोकेशन व मिळालेल्या माहितीवरून तिघा संशयितांना कर्नाटक हद्दीतून पोलिसांनी अटक केली.