चहा विक्रेत्या महिलेवर खुनी हल्ला
By Admin | Updated: June 5, 2016 01:11 IST2016-06-05T01:11:48+5:302016-06-05T01:11:48+5:30
शिये-हनुमाननगर येथील घटना : दागिन्यांची लूट; अज्ञात चौघांचे कृ त्य

चहा विक्रेत्या महिलेवर खुनी हल्ला
कोल्हापूर : शिये जुना जकात नाका येथे चहा विक्रेत्या महिलेवर अज्ञात चौघांनी लोखंडी गजाने खुनी हल्ला करून अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेत पलायन केले. संगीता चंद्रकांत पोतदार (वय ४०, रा. हनुमाननगर, शिये, ता. करवीर) या गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी, संगीता पोतदार यांची शिये जुना जकात नाका येथे चहाची टपरी आहे. दुपारी चारच्या सुमारास त्या एकट्या असताना तेथे चौघे तरुण आले. त्यांनी त्यांच्या टपरीवर अंडा आॅम्लेट खाऊन चहा पिला. पोतदार यांनी त्यांच्याकडे बिलाची मागणी करताच त्यांनी आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून लोखंडी गजाने त्यांना बेदम मारहाण केली. डोक्यात, तोंडावर, पाठीवर, खांद्यावर व हातावर गंभीर वार करून त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन ते पळून गेले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मदतीसाठी हाक दिली. येथील वाहनधारकांसह नागरिकांनी त्यांना शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. त्यांची प्रकृ ती गंभीर असल्याने त्यांना पोलिसांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले.
याठिकाणी त्यांच्यावर उपचार केले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अज्ञातांनी हल्ला केल्याचे सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)