कोल्हापूरात तरुणावर खुनी हल्ला
By Admin | Updated: April 11, 2017 18:33 IST2017-04-11T18:33:06+5:302017-04-11T18:33:06+5:30
आरसी गँगच्या तिघांना अटक

कोल्हापूरात तरुणावर खुनी हल्ला
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : सुभाषनगर येथे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून केलेल्या खुनी हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. असिफ अस्लम शेख (वय १८, रा. सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आरसी गँगच्या तिघा गुंडांना सोमवारी रात्री अटक केली. संशयित गणेश पंडित बामणे (२३), अमित अंकुश बामणे (२७), साईप्रसाद संभाजी कांबळे (२१, सर्व रा. सुभाषनगर) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, असिफ शेख व गणेश बामणे यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास असिफ मित्रांसोबत भेळ खायला गेला होता. याठिकाणी गणेश बामणे, अमित बामणे व साई कांबळे आले. त्यांनी रस्त्यावर रिक्षा व दुचाकी आडव्या लावून दहशत माजवत आमच्याकडे काय बघतोस, म्हणून असिफवर चाकूने खुनी हल्ला केल्या.
डोक्यात वर्मी घाव लागल्याने जिवाच्या भीतीने असिफ सुभाषनगर पोलिस चौकीत पळत गेला. येथील पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ त्याला सीपीआरमध्ये उपचाराला पाठविले. त्यानंतर संशयित तिघांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक स्मिता काळभोर करत आहेत. (प्रतिनिधी)