शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

कागलमध्ये तरुणाचा भोसकून खून, तिघा अज्ञातांचे कृत्य : कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 20:34 IST

घरातून बोलवून घेऊन मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हाकेच्या अंतरावर तरुणाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना आंबील कट्टी कागल येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे मृताचे नाव आहे. खून कोणी केला, कोणत्या कारणातून केला याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. खून प्रकरणामुळे कागलमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकागलमध्ये तरुणाचा भोसकून खूनतिघा अज्ञातांचे कृत्य : कारण अस्पष्ट

कोल्हापूर : घरातून बोलवून घेऊन मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हाकेच्या अंतरावर तरुणाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना आंबील कट्टी कागल येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे मृताचे नाव आहे. खून कोणी केला, कोणत्या कारणातून केला याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. खून प्रकरणामुळे कागलमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान घटनास्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदार, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि सूरजचे मित्र, त्याचे पूर्व वैमन्स्य कोणाशी होते याबाबत माहिती घेवून मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीसांनी सांगितले, सूरज घाटगे हा कागल औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी कारखान्यात नोकरी करीत होता. त्याचे वडील कागल नगरपरिषदेमध्ये नोकरी करतात. आई घरकाम करते. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले असून एक महिन्याची मुलगी आहे. शनिवारी तो घरी असताना सायंकाळी सहाच्या सुमारास मोबाइ्लवर फोन आल्याने तो जाऊन येतो असे सांगुन घराबाहेर पडला.

गल्लीमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा तरुणांनी त्याला मोटारीवर बसवून काही अंतर पुढे नेले. रस्त्याकडेला थांबून त्यांचेत वादावादी झाली. यावेळी एकाने त्याला चाकुने भोसकले. तो मोठ्याने ओरडून जमिनीवर कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिलेनंतर त्यांनी धाव घेतली. लोक आलेचे पाहून तिघे मारेकरी धूम स्टाईलने पळून गेले.

घरापासून काही अंतरावर ही घटना घडल्याने नातेवाईकांनी धाव घेत त्याला कागल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्याची प्रकृत्ती गंभीर असलेचे पाहून येथील डॉक्टरांनी सीपीआरला नेण्यास सांगितले.

रुग्णवाहीकेतून कोल्हापूरला येत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती कागल पोलीसांना समजताच त्यांनी सीपीआरकडे धाव घेतली. शवगृहामध्ये त्याचे मृतदेहाचा पंचनामा केला. त्याच्या आई-वडीलांसह पत्नीचा अक्रोश हदय पिळवटू टाकणारा होता.वडील स्तब्ध सूरजच्या पोटात गंभीर वार झाल्याने रक्तस्त्राव झाला होता. हातातोंडाला आलेल्या मुलाला कोणी मारले, कशाबद्दल मारले हे काहीच माहित नव्हते. एकुलत्या मुलाचा मृत्यू झालेचे समजताच ते काहीवेळ स्तब्धच उभे राहिले. त्यांना काहीच समजत नव्हते. भांबावून गेलेल्या वडीलांची अवस्था पाहून अनेकांचे डोळे भरुन आले.कष्टाची सवयसूरजची स्वत:ची मोटार आहे. भाडे आले की बाहेरगावी जात असे. इतरवेळी तो कारखान्यात काम करीत होता. त्याला कष्टाची सवय होती. त्याचा खून आर्थिक वादातून की अन्य कोणत्या कारणातून झाला हे स्षष्ट झालेले नाही. 

 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर