सातवेच्या तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून, गावात तणावपूर्ण स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:35+5:302021-09-10T04:30:35+5:30
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिवतेज याचे गावातील एका तरुणीशी एक वर्षापूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या प्रेमप्रकरणाला दोन्ही कुटुंबांतून विरोध ...

सातवेच्या तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून, गावात तणावपूर्ण स्थिती
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिवतेज याचे गावातील एका तरुणीशी एक वर्षापूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या प्रेमप्रकरणाला दोन्ही कुटुंबांतून विरोध होता. सहा महिन्यांपूर्वी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद असून, ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. दोन्ही कुटुंबांच्यावतीने या प्रकरणावर गावपातळीवर तोडगा काढण्यात आला होता. शिवतेज हा वारणा महाविद्यालयामध्ये बारावीचे शिक्षण घेत असून, त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात दफन करण्यात आला. त्याच्या पश्चात आई, भाऊ, चुलते असा परिवार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने सातवे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण आहे. या घटनेचा अधिक तपास शिराळा व कोडोली पोलीस करत आहे.