शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत मोबाइलवरून वाद, कोल्हापुरात फिरस्त्या मजुराचा खून; हल्लेखोर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 12:04 IST

शहरात भटकून मिळेल ते मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता

कोल्हापूर : दारूच्या नशेत मोबाइलवरून झालेल्या वादातून फिरस्ता मजूर विनायक विशाल लोंढे (वय ३२, रा. सदर बाजार, कोल्हापूर) याचा डोक्यात सोड्याच्या आणि दारूच्या बाटल्या मारून मित्रानेच खून केला. हल्लेखोर समीर युनूस मणेर (वय ३२, मूळ रा. कदमवाडी, सध्या रा. विक्रमनगर, कोल्हापूर) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाणपुलाजवळ गिरीश बारनजीक घडली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक लोंढे याच्या आई-वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले असून, तो शहरात भटकून मिळेल ते मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. त्याचा भाऊ नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहतो. सोमवारी रात्री तो मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाणपुलाजवळ असलेल्या एका सोडा वॉटरच्या गाडीजवळ मित्र समीर मणेर याच्यासोबत मद्यप्राशन करीत बसला होता. त्यावेळी दोघांमध्ये मोबाइलवरून वाद झाला. याच वादातून दोघांमध्ये झटापट झाली. मणेर याने जवळ असलेल्या सोड्याच्या आणि दारूच्या बाटल्या डोक्यात मारल्याने लोंढे खाली कोसळला. मारहाणीचा प्रकार पाहून धावत आलेला रिक्षाचालक जावेद अजीज मणेर (रा. कदमवाडी) याने रुग्णवाहिकेतून लोंढे याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती.घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. तसेच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने हल्लेखोर मणेर याला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत झालेल्या वादातून लोंढे याचा खून झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोर मणेर याच्यासोबत अन्य काही साथीदार होते काय, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळी काचांचा खचघटनास्थळी सोड्याच्या आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. यातील काही बाटल्या फुटल्या होत्या. दोघांनी एकमेकांच्या दिशेने बाटल्या भिरकावल्यामुळे काही बाटल्या रस्त्यावरही गेल्या होत्या. अवघ्या दोन ते तीन मिनिटांत झालेल्या मारामारीत काचांचा खच पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी