शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: शहापुरात पानपट्टी चालकाचा खून, हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 12:12 IST

जेवण करुन घरी परतताना झाला हल्ला

इचलकरंजी : येथील विठ्ठलनगर शहापूर परिसरातील एका पानपट्टी चालक युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. रहमान मलिक नदाफ (वय २०) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रहमान हा आपल्या आईसोबत विठ्ठलनगरात राहत होता. त्याने दिड महिन्यापूर्वी विठ्ठलनगर परिसरातील चौकात पानपट्टी सुरू केली आहे. त्यापूर्वी तो यंत्रमागावर मिळेल तिथे काम करत होता. सोमवारी रात्री पानपट्टी बंद करून तो आपल्या मित्रांसोबत जेवायला गेला होता. तेथून आल्यानंतर चौकात थांबून घरी जाताना मोटारसायकल वरून आलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने रहमान याच्यावर हल्ला चढवला. सपासप वार करून हल्लेखोर पसार झाले.त्याच्या मानेवर, डोक्यात वर्मी घाव बसल्याने रहमान खाली कोसळला. आरडाओड ऐकूण परिसरातील नागरिक जमले. त्यांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही माहिती समजताच घटनास्थळी व रुग्णालयात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व शिवाजीनगरचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली. हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.शहापूर पोलिसांनी पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरू होते. रुग्णालय परिसरात रात्री गर्दी जमली होती. अधिक तपास शहापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी