शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळ केल्याच्या रागातून परप्रांतीय कामगाराचा खून, शाहूवाडी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 14:14 IST

शाहूवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथे किरकोळ वादातून परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची घटना घडली. अक्षय गावकर (वय ...

शाहूवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथे किरकोळ वादातून परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची घटना घडली. अक्षय गावकर (वय २९, रा. रामनगर, ता. जोयडा, जि. कारवार, कर्नाटक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी सहदेव थाणु यादव (मु. कोटवारटिह, पो. चंदवारा, ता. चंदवारा, जि. कोडरमा, झारखंड) याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अश्लिल शिवीगाळ केल्याच्या रागातून अक्षयच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून ठार मारल्याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. काल, शुक्रवारी (दि.२५) रात्री उशिरा ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथील म्हसोबा मंदिराजवळ बाॅक्साईट डेपो आहे. या बाॅक्साईट डेपोवर मृत अक्षय गावकर हा भुमी रिसोर्जेस प्रायव्हेट लि. या कंपनीकडे भाडेतत्वार असलेल्या मशिनरीवर व्हिल लोडरवर काम करत होता. तर आरोपी सहदेव यादव हा पोकलँडवर ऑपरेटर म्हणून काम करतो. काल, शुक्रवारी रात्री  मृत अक्षय व सहदेव यांच्यात वादावादी झाली. यावेळी अक्षयने सहदेवला अश्लील शिवीगाळ केली.हा राग मनात धरून सहदेवने अक्षयवर लोखंडी पाईपने वार केला. यात अक्षयला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत झाला. याबाबत कंपनीचे सुफर वायझर  बसवराज कल्लाप्पा पाटील (रा. शाहूवाडी) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत अक्षय गावकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रूग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीshahuwadi-acशाहूवाडी