प्रियकराकडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:08 IST2019-08-01T01:08:00+5:302019-08-01T01:08:04+5:30

निपाणी : पे्रयसीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरल्याने निराश झालेल्या प्रियकराने पे्रयसीच्या डोक्यात वार करीत खून केल्याची घटना बुधवारी सकाळी ...

Murder from a lover | प्रियकराकडून खून

प्रियकराकडून खून

निपाणी : पे्रयसीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरल्याने निराश झालेल्या प्रियकराने पे्रयसीच्या डोक्यात वार करीत खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. अमृता अनिल कुंभार (वय २४, रा. जांभळी, ता. शिरोळ) असे मृत युवतीचे नाव आहे. प्रियकर योगेश विलास चौगुले (२५, रा. बारवाड, ता. निपाणी) याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, खून केल्याच्या तीन दिवसांनी योगेश याने स्वत:हून पोलीस ठाण्यात येऊन खुनाची कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी योगेश हा जांभळीत मामा प्रदीप बनगे यांच्याकडे राहत होता. जांभळी येथे राहताना अमृता हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सहा वर्षांपासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. दरम्यान, अमृता हिचे लग्न दुसरीकडे ठरल्यामुळे योगेश नाराज झाला होता. त्याने अमृताशी संपर्क करून लग्नानंतर आपण भेटू शकणार नाही. त्यामुळे शेवटची भेट घेऊया, असे सांगितले. यावर अमृता शनिवारी (दि. २७) भेटण्यासाठी बोरगाववाडी कसनाळ मार्गावर आली होती. या ठिकाणी योगेशने अमृताच्या डोक्यात रॉडने वार केले. या मारहाणीत अमृताचा मृत्यू झाला. योगेशने नजीकच्या उसाच्या शेतात मृतदेह टाकून तेथून पळ काढला होता. तीन दिवसांनी योगेशने निपाणी शहर पोलिसांत हजर होत आपण अमृताचा खून केल्याची माहिती दिली. निपाणी पोलिसांनी सदलगा पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. यानंतर बुधवारी सकाळी उसाच्या शेतातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिकोडीचे एएसपी मिथुनकुमार, सीपीआय बसवराज मुकार्तिहाळ, सदलगा स्थानकाचे फौजदार संगमेश दिडगिनिहाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: Murder from a lover