इचलकरंजीत कामगारावर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:22 IST2021-03-19T04:22:21+5:302021-03-19T04:22:21+5:30

इचलकरंजी : दाते मळा येथील इराणी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या, कापडाच्या गाठी बांधणाऱ्या कामगारावर धारदार शस्त्राने वार करून हल्ला करण्यात आला. ...

Murder attack on Ichalkaranji worker | इचलकरंजीत कामगारावर खुनी हल्ला

इचलकरंजीत कामगारावर खुनी हल्ला

इचलकरंजी : दाते मळा येथील इराणी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या, कापडाच्या गाठी बांधणाऱ्या कामगारावर धारदार शस्त्राने वार करून हल्ला करण्यात आला. प्रेमाराम खेमाराम चौधरी (वय ४३) असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांची पत्नी सुंदरदेवी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना बुधवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, इराणी बिल्डिंग चौथ्या मजल्यावर प्रेमाराम व त्यांची पत्नी सुंदरदेवी राहतात. कापडाच्या पेढ्यांवर कापडाच्या गाठी बांधण्याचे काम प्रेमाराम करतात. मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोर बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत चौथ्या मजल्यावरील प्रेमाराम यांच्या घरात घुसले. त्यांना झोपेतच चादरीमध्ये गुंडाळून धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर व अंगावर वार केले. यामध्ये त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा तुटला आहे. त्यावेळी हल्लेखोरांना अडविताना पत्नी सुंदरदेवी यांनाही मारहाण केल्याने त्या किरकोळ जखमी होऊन बेशुद्ध पडल्या. शेजाऱ्यांची चाहूल लागताच हल्लेखोर तेथून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेमाराम यांना नागरिकांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट दिली. दरम्यान, हा हल्ला कापड गाठी बांधण्याच्या कामातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. हल्लेखोरांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Murder attack on Ichalkaranji worker