शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मुरलीधर जाधव यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’; शिंदे गटात प्रवेश करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 19:22 IST

हुपरी: उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी अखेर पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. महिन्यापुर्वीच मुरलीधर जाधव यांना पदावरून ...

हुपरी: उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी अखेर पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. महिन्यापुर्वीच मुरलीधर जाधव यांना पदावरून हटवण्यात आले होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आपल्या विरोधात डावपेच रचल्याचा आरोप केला होता. याघडामोडीनंतर अखेर त्यांनी ठाकरे गटाला रामराम केला. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.गेली 19 वर्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले मुरलीधर जाधव यांची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ गोकुळच्या शासन नियुक्त संचालक पदी निवड केली होती. शिवसेना हुपरी शहर प्रमुख जिल्हाप्रमुख असा मुरलीधर जाधव यांचा प्रवास होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी शेट्टी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. यानंतर शिवसेनेकडून मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या घडामोडीनंतर माध्यमांशी बोलताना जाधव यांना अश्रू अनावर झाले होते. मात्र, जाधव यांनी आतापर्यंत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर त्यांनी आज ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेनेचे कोल्हापुरात तीन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशन होत असून या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसमवेत जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना