महापालिका शिक्षकांना ‘एनपीएस’ योजना लागू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:58+5:302021-08-20T04:28:58+5:30
कोल्हापूर : येथील महापालिका शिक्षकांना एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) योजना लागू करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीने ...

महापालिका शिक्षकांना ‘एनपीएस’ योजना लागू करावी
कोल्हापूर : येथील महापालिका शिक्षकांना एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) योजना लागू करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीने गुरूवारी केली. त्याबाबतचे निवेदन महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे आणि उपायुक्त रविकांत आडसूळ यांना समितीकडून देण्यात आले.
राज्यातील सर्व शासकीय - निमशासकीय कर्मचाऱ्यांची ‘डीसीपीएस’मधली खाती ‘एनपीएस’मध्ये वर्ग करण्यात आली आहेत. पण कोल्हापूर महापालिकेमध्ये अद्याप २००५नंतर सेवेत रूजू झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची डीसीपीएस योजनेतील खाती एनपीएस योजनेमध्ये वर्ग करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. त्यावर महापालिकेने तातडीने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची डीसीपीएस योजनेची खाती बंद करून एनपीएस योजनेमध्ये वर्ग करावीत. एनपीएसचा लाभ सन २००५नंतर लागलेल्या सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी राज्य शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत, राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई, पुरोगामी संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे, शिक्षक समितीचे शहराध्यक्ष संजय पाटील, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिलीप माने, उत्तम गुरव, विनोदकुमार भोंग, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.