शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सभा : पाणीपट्टी सवलतीवरून खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:33 IST

MuncipaltyCarportaion, water, meeting, kolhpurnews लॉकडाऊनमध्ये पाण्याचा वापर झाला नसल्याने व्यापाऱ्यांना पाणीपट्टीत सवलत देण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी महापालिका सभेत प्रशासनाची खरडपट्टी करण्यात आली. महापूर येऊन वर्ष झाले तरी पूरग्रस्तांची महिन्यांची पाणीपट्टी सवलत मिळालेली नाही, असे असताना व्यापाऱ्यांना सवलत देण्यासाठी प्रशासनाचा आग्रह का आहे. व्यापाऱ्यांचे हित पाहण्यापेक्षा पूरग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, अशा शब्दांत प्रशासनाला सुनावले. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.

ठळक मुद्दे महापालिका सभा : पाणीपट्टी सवलतीवरून खरडपट्टी व्यापाऱ्यांपेक्षा पूरग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये पाण्याचा वापर झाला नसल्याने व्यापाऱ्यांना पाणीपट्टीत सवलत देण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी महापालिका सभेत प्रशासनाची खरडपट्टी करण्यात आली. महापूर येऊन वर्ष झाले तरी पूरग्रस्तांची महिन्यांची पाणीपट्टी सवलत मिळालेली नाही, असे असताना व्यापाऱ्यांना सवलत देण्यासाठी प्रशासनाचा आग्रह का आहे. व्यापाऱ्यांचे हित पाहण्यापेक्षा पूरग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, अशा शब्दांत प्रशासनाला सुनावले. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.जलअभियंता भास्कर कुंभार यांनी लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांची व्यवसाय बंद असल्याने हा प्रस्ताव आणल्याचे सांगितले. तीन हजार व्यापाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असून त्यांना ७२ लाखांची सवलत दिली जाणार आहे. १२ हजार ५०० पूरग्रस्तांना एक महिन्यांची पाणीपट्टीत सवलत दिली जात असल्याचे स्पष्ट केले.गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, १०० टक्के व्यवसाय बंद असणाऱ्यांचा यामध्ये समावेश असावा. रुग्णालयांना यामधून वगळण्यात यावे. सदस्या रूपाराणी निकम यांनी व्यापाऱ्यांपेक्षा सामान्य नागरिकांचा विचार करावा. झोपडपट्टी परिसर, नाल्यालगतच्या पूरग्रस्तांना एक रुपयाचीही सवलत मिळाली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणले.देशमुख, ठाणेकर यांच्यात खडाजंगीगटनेते अजित ठाणेकर म्हणाले, ज्यांची मीटर बंद दाखवून किमान बिल आकारणी होते, फुकट आणि चोरून पाणी वापर करतात. अशांना सवलत देऊ नये, अशी सूचना केली. यावर गटनेते शारंगधर देशमुख भडकले. ज्यांचे व्यवसाय बंद होते, त्यांना सवलत दिलीच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. महापुरातील नुकसान झालेल्या नागरिकांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यावरूनही वादावादी झाली. ५० नागरिकांसाठी १२ हजार नागरिकांची सवलत देण्याचे थांबवू नये, असेही देशमुख यांनी म्हटले. यावर महापौर आजरेकर यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या अर्जांचा विचार करावा,असे आदेश दिले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरwater shortageपाणीकपात