पालिका निवडणूक ताराराणी पक्षातर्फे स्वबळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:12+5:302021-02-05T07:07:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : आगामी नगरपालिका निवडणुकीत ताराराणी पक्षातर्फे सर्व जागा स्वबळावर लढविण्यात येणार आहेत. जो सर्वसामान्यांचे प्रश्‍न ...

Municipal elections on their own by Tararani Party | पालिका निवडणूक ताराराणी पक्षातर्फे स्वबळावर

पालिका निवडणूक ताराराणी पक्षातर्फे स्वबळावर

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : आगामी नगरपालिका निवडणुकीत ताराराणी पक्षातर्फे सर्व जागा स्वबळावर लढविण्यात येणार आहेत. जो सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासह पक्ष संघटन बळकट करेल, त्यालाच पाठबळ दिले जाईल, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी शनिवारी केली. तसेच ताराराणी पक्षाच्या विविध कार्यकारिणींची घोषणाही लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ताराराणी पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आवाडे बोलत होते. ते म्हणाले, आवश्यक त्या सुविधांची पूर्तता, नागरी प्रश्‍नांची सोडवणूक आणि शहराचा विकास यासाठीच आम्ही नगरपालिका सत्तेत सहभागी झालो आहोत. मी कोठे जाणार? काय करणार? याची चर्चा ही होतच राहणार आहे. त्याकडे न पाहता आपण सर्वांनी ताराराणी पक्ष म्हणून कार्यरत राहावे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठीच आम्ही येत असून, आगामी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपलाच विजय निश्‍चित आहे. त्याचबरोबर सध्या नगर परिषदेत दोन महत्वाची खाती आपल्याकडे असून, त्या माध्यमातून शहरातील सुविधांची वानवा दूर करुन नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा दिल्या जातील. आम्ही सत्तेत गेलो म्हणजे आम्ही कोणापुढे शरणागती पत्करलेली नसून, चांगल्या कामासाठी सहकार्य आणि अनधिकृत कामांना आमचा कायम विरोध असणार आहे.

..........

कोल्हापूर महावितरण कार्यालयावर रॅली

लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिलात १०० युनिटपर्यंत सूट मिळावी. त्याचबरोबर यंत्रमाग व्यवसाय व लघु उद्योगांसाठी जाहीर केलेली १ रुपयाची सवलत मिळावी, यासाठी ताराराणी पक्षातर्फे सोमवारी (दि. ८) कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयावर मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.

Web Title: Municipal elections on their own by Tararani Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.