महापालिका निवडणूक : अनेक मातब्बर नगरसेवकांवर गंडांतर, तर अनेकांना प्रभाग बदलण्याची वेळ
By Admin | Updated: August 1, 2015 00:02 IST2015-08-01T00:02:10+5:302015-08-01T00:02:10+5:30
मूळ गावठाण जैसे थे; उपनगरांतीलच प्रभाग वाढले

महापालिका निवडणूक : अनेक मातब्बर नगरसेवकांवर गंडांतर, तर अनेकांना प्रभाग बदलण्याची वेळ
महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीतील धक्कादायक उलथापालथीने अनेक मातब्बर नगरसेवकांना आपल्या हक्काच्या प्रभागांवर पाणी सोडावे लागले; तर अनेकांना आपले प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागाकडे मोर्चा वळवावा लागणार आहे. जरी दुसऱ्या प्रभागात जाऊन निवडणूक लढवायची म्हटले तरी मोठी दमछाक होणार आहे. त्यामुळे पर्यायी भागांचा अभ्यास केल्यानंतरच काही नगरसेवकांना निर्णय घ्यावे लागणार आहे.
यांच्यावर आले गंडांतर
चंद्रकांत घाटगे, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, कांचन कवाळे, कादंबरी कवाळे, मधुकर रामाणे, महेश सावंत, महेश गायकवाड, इंद्रजित बोंद्रे, रमेश पोवार, सचिन खेडकर, दिलीप भुर्के, भूपाल शेटे, महेश जाधव, किरण शिराळे, निशिकांत मेथे, जहाँगीर पंडत, विजय सूर्यवंशी, प्रकाश पाटील, मोहन गोंजारे, प्रकाश काटे, प्रकाश गवंडी.
यांचे प्रभाग बदलणार
सचिन चव्हाण, राजेश लाटकर, महेश जाधव, प्रकाश नाईकनवरे, प्रतिभा नाईकनवरे, अरुणा टिपुगडे, संभाजी जाधव, रविकिरण इंगवले यांना आपले प्रभाग बदलावे लागणार आहेत.
नशीबवान नगरसेवक
प्रदीप उलपे, संदीप नेजदार, अजित पोवार, नीलेश देसाई, लीला धुमाळ, राजाराम गायकवाड, सरस्वती दिलीप पोवार, संजय मोहिते, जयश्री सोनवणे, परिक्षित पन्हाळकर, प्रभा टिपुगडे, दीपाली सुरेश ढोणुक्षे, जयश्री राजेंद्र साबळे यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागातून उभे राहण्याची संधी असेल.
सर्वसाधारण प्रवर्ग - 24
प्रभाग क्रमांक - ०२ : कसबा बावडा पूर्व बाजू
प्रभाग क्रमांक - ०३ : कसबा बावडा हनुमान तलाव
प्रभाग क्रमांक - ०४ : कसबा बावडा पॅव्हेलियन
प्रभाग क्रमांक - ०५ : लक्ष्मीविलास पॅलेस
प्रभाग क्रमांक - ०८ : भोसलेवाडी-कदमवाडी
प्रभाग क्रमांक - ११ : ताराबाई पार्क
प्रभाग क्रमांक - १२ : नागाळा पार्क
प्रभाग क्रमांक - १३ : रमणमळा
प्रभाग क्रमांक - १४ : व्हीनस कॉर्नर
प्रभाग क्रमांक - १५ : कनाननगर
प्रभाग क्रमांक - १६ : शिवाजी पार्क
प्रभाग क्रमांक - २४ : साईक्स एक्स्टेन्शन
छ प्रभाग क्रमांक - ३२ : बिंदू चौक
छ प्रभाग क्रमांक - ३९ : राजारामपुरी एक्स्टेन्शन
छ प्रभाग क्रमांक - ४२ : पांजरपोळ
छ प्रभाग क्रमांक - ४५ : कैलासगडची स्वारी
छ प्रभाग क्रमांक - ४८ : तटाकडील तालीम
छ प्रभाग क्रमांक - ५२ : बलराम कॉलनी
छ प्रभाग क्रमांक - ५४ : चंद्रेश्वर
छ प्रभाग क्रमांक - ५५ : पद्माराजे उद्यान
छ प्रभाग क्रमांक - ५७ : नाथा गोळे तालीम
छ प्रभाग क्रमांक - ६४ : विद्यापीठ-कृषी महाविद्यालय
छ प्रभाग क्रमांक - ६५ : राजेंद्रनगर
छ प्रभाग क्रमांक - ७१ : रंकाळा तलाव
सर्वसाधारण महिला प्रगर्व--24
छ प्रभाग क्रमांक - १० : शाहू कॉलेज
छ प्रभाग क्रमांक - १७ : सदर बझार
छ प्रभाग क्रमांक - १८ : महाडिक वसाहत
छ प्रभाग क्रमांक - २० : राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड
छ प्रभाग क्रमांक - २३ : रुईकर कॉलनी
छ प्रभाग क्रमांक - २५ : शाहूपुरी तालीम
छ प्रभाग क्रमांक - २६ : कॉमर्स कॉलेज
छ प्रभाग क्रमांक - २७ : ट्रेझरी आॅफिस
छ प्रभाग क्रमांक - २९ : कोकणे मठ
छ प्रभाग क्रमांक - ३३ : महालक्ष्मी मंदिर
छ प्रभाग क्रमांक - ३८ : टाकाळा खण, माळी कॉलनी
छ प्रभाग क्रमांक - ४१ : प्रतिभानगर
छ प्रभाग क्रमांक - ४४ : मंगेशकरनगर
छ प्रभाग क्रमांक - ४६ : सिद्धाळा गार्डन
छ प्रभाग क्रमांक - ४७ : फिरंगाई
छ प्रभाग क्रमांक - ५० : पंचगंगा तालीम
छ प्रभाग क्रमांक - ५१ : लक्षतीर्थ वसाहत
छ प्रभाग क्रमांक - ६२ : बुद्धगार्डन
छ प्रभाग क्रमांक - ६३ : सम्राटनगर
छ प्रभाग क्रमांक - ६६ : स्वातंत्र्यसैनिक वसाहत
छ प्रभाग क्रमांक - ७२ : फुलेवाडी
छ प्रभाग क्रमांक - ७५ : आपटेनगर-तुळजाभवानी
छ प्रभाग क्रमांक - ७६ : साळोखेनगर
छ प्रभाग क्रमांक -७९ : सुर्वेनगर
.
५अनुसूचित जाती प्रवर्ग--5
छ प्रभाग क्रमांक - ०१ : शुगर मिल
छ प्रभाग क्रमांक - २१ : टेंबलाईवाडी
छ प्रभाग क्रमांक - ५८ : संभाजीनगर
छ प्रभाग क्रमांक - ६० : जवाहरनगर
छ प्रभाग क्रमांक - ८१ : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर -
जिवबा नाना पार्क
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) -11
छ प्रभाग क्रमांक - ०६ : पोलीस लाईन
छ प्रभाग क्रमांक - ०७ : सर्किट हाऊस
छ प्रभाग क्रमांक - ३० : खोलखंडोबा
छ प्रभाग क्रमांक - ३१ : बाजारगेट
छ प्रभाग क्रमांक - ३५ : यादवनगर
छ प्रभाग क्रमांक - ३७ : राजारामपुरी-तवणाप्पा पाटणे हायस्कूल
छ प्रभाग क्रमांक - ६१ : सुभाषनगर
छ प्रभाग क्रमांक - ६७ : रामानंदरनगर-जरगनगर
छ प्रभाग क्रमांक - ७४ : सानेगुरुजी वसाहत
छ प्रभाग क्रमांक - ७७ : शासकीय मध्यवर्ती कारागृह
छ प्रभाग क्रमांक - ७८ : रायगड कॉलनी-बाबा जरगनगर
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) -11
छ प्रभाग क्रमांक - १९ : मुक्त सैनिक वसाहत
छ प्रभाग क्रमांक - २८ : सिद्धार्थनगर
छ प्रभाग क्रमांक - ३४ : शिवाजी उद्यमनगर
छ प्रभाग क्रमांक - ३६ : राजारामपुरी
छ प्रभाग क्रमांक - ४० : दौलतनगर
छ प्रभाग क्रमांक - ४३ : शास्त्रीनगर-जवाहरनगर
छ प्रभाग क्रमांक - ४९ : रंकाळा स्टॅँड
छ प्रभाग क्रमांक - ५३ : दुधाळी पॅव्हेलियन
छ प्रभाग क्रमांक - ५६ : संभाजीनगर बसस्थानक
छ प्रभाग क्रमांक - ६९ : तपोवन
छ प्रभाग क्रमांक - ७० : राजलक्ष्मीनगर
-- 6 अनुसूचित जाती प्रवर्ग-महिला (ओबीसी)
छ प्रभाग क्रमांक - ०९ : कदमवाडी
छ प्रभाग क्रमांक - २२ : विक्रमनगर
छ प्रभाग क्रमांक - ५९ : नेहरूनगर
छ प्रभाग क्रमांक - ६८ : कळंबा फिल्टर हाऊस
छ प्रभाग क्रमांक - ७३ : फुलेवाडी
छ प्रभाग क्रमांक - ८० : कणेरकरनगर-क्रांतिसिंह नाना पाटीलनगर
नेते म्हणतात...आम्ही सज्ज...
प्रभाग निश्चितीबरोबर शुक्रवारी आरक्षण जाहीर झाले असले तरी आम्ही याअगोदरचपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी पारंपरिक मित्र जनसुराज्य पक्षाला बरोबर घेऊन निवडणुकीस सामोरे जाणार आहे.
- आमदार हसन मुश्रीफ
प्रभाग रचना शिवसेनेसाठी अत्यंत पोषक अशी आहे. अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. यातील ९० टक्के कार्यकर्त्यांना संधी मिळेल. काहीही झाले तरी महापालिकेवर भगवा फडकविणारच.
- आमदार राजेश क्षीरसागर
प्रभाग रचनेत भौगोलिक सलगता नसल्याने निवडणूक येणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात काम करताना अनेक अडचणी येणार आहेत. मी, माजी आमदार पी. एन. पाटील आणि मालोजीराजे पुन्हा एकदा एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
- सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री
प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्याने आता महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. नव्याने झालेली प्रभाग रचना आणि आरक्षणाची माहिती घेऊन येत्या दोन दिवसांत याबाबतचे मत जाहीर करू.
. - विनय कोरे, माजी आमदार
प्रशासनाने आरक्षण व प्रभाग रचनेची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने राबविली. अनेक इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधला आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडे ८१ प्रभागांत सक्षम उमेदवार आहेत. उमेदवारांची यादी प्रथम आमची आघाडीच जाहीर करील.
-महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप
आरक्षण जाहीर झाल्यामुळे उमेदवार निवडीचा मार्ग खुला झाला आहे. येत्या आठ दिवसांत ताराराणी आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार होईल. मी स्वत: व्हीनस कॉर्नरच्या प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक रिंगणार उतरणार आहे.
सुनील मोदी, संयोजक, ताराराणी आघाडी
मूळ गावठाण जैसे थे; उपनगरांतीलच प्रभाग वाढले
प्रभाग रचना : भौगोलिक संलग्नता नसल्याचा आरोप; प्रत्येक प्रभागात दोन हजार नव्या मतदारांची भर
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीची नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मूळ गावठाणातील प्रभाग ‘जैसे थे’ असून उपनगरांतील प्रभागांत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. यापूर्वी उत्तर मतदारसंघात ४१ प्रभाग होते. यामध्ये चारची वाढ होऊन ते ४५ झाले; तर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ३० प्रभागांवरून ३६ प्रभाग झाले.
२०११ च्या नव्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराच्या एकूण ५,४९,२८३ लोकसंख्येपैकी पुरुषांची लोकसंख्या २,८०,८२०; तर स्त्रियांची संख्या २,६८,४६३ इतकी आहे़ यानुसारच महापालिकेने प्रभागनिहाय मतदार याद्या निश्चित करण्याचे काम पूर्ण केले आहे. प्रत्येक प्रभागात किमान दोन हजार नवीन मतदारांची भर पडणार आहे. महापालिकेच्या सध्याच्या ७७ प्रभागांत आणखी चार प्रभागांची भर पडली आहे. सभागृहात प्रत्यक्ष निवडून आलेले ८१, तर स्वीकृत पाच असे एकूण ८६ नगरसेवक असणार आहेत.
उत्तर मतदारसंघातील प्रभाग
खोलखंडोबा, बाजारगेट, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर, शिवाजी उद्यमनगर, यादवनगर, राजारामपुरी, तवणाप्पा पाटणे हायस्कूल, टाकाळा खण-माळी कॉलनी, पांजरपोळ, मंगेशकरनगर, कैलासगडची स्वारी, सिद्धाळा गार्डन, फिरंगाई, तटाकडील तालीम, रंकाळा स्टॅँड, पंचगंगा तालीम, बलराम कॉलनी, दुधाळी पॅव्हेलियन, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, चंद्रेश्वर, पद्माराजे, नाथागोळे तालीम, कसबा बावडा पूर्व, शुगर मिल, कसबा बावडा हनुमान तलाव, पॅव्हेलियन, लक्ष्मीविलास पॅलेस, पोलीस लाईन, सर्किट हाऊस, भोसलेवाडी-कदमवाडी, शाहू कॉलेज, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमणमळा, व्हीनस कॉर्नर, कनाननगर, शिवाजी पार्क, सदर बझार, महाडिक वसाहत, मुक्त सैनिक वसाहत, शाहूपुरी तालीम, कॉमर्स कॉलेज, ट्रेझरी आॅफिस, सिद्धार्थनगर, कोकणे मठ.
फुलेवाडी ते जरगनगर : सलग नऊ प्रभागांत ‘महिला राज’
यंदाच्या निवडणुकीत ८१ पैकी निम्म्या प्रभागात पन्नास टक्के आरक्षणामुळे महिलांना संधी मिळणार आहे; परंतु फुलेवाडीपासून सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर-तुळजाभवानी, साळोखेनगर, शासकीय मध्यवर्ती कारागृह, रायगड कॉलनी-बाबा जरगनगर, सुर्वेनगर आणि कणेरकरगनर-क्रांतिसिंह नाना पाटील नगर हे सलग नऊ प्रभाग अनुसूचित जाती, नागारिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
भौगोलिक संलग्नता नाही..
प्रभाग रचना करताना भौगोलिक संलग्नता फारशी पाहिली नसल्याच्या तक्रारी लोकांतून व्यक्त होत आहेत. अनेक प्रभागांचे चार-चार तुकडे पडले असल्याने राजकीदृष्या व विकासकामे करतानाही अडचणी येणार असल्याचे महापालिका क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या जाणकारांचे म्हणणे आहे.