महापालिका : हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:12 PM2021-01-13T12:12:11+5:302021-01-13T12:14:36+5:30

Muncipal Corporation Kolhapur- हद्दवाढीसंदर्भातील अद्ययावत माहिती संकलीत करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जाणार आहे. याचबरोबर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे हद्दवाढीसंदर्भातील प्रस्ताव, फाइलींची मागणी संबंधित विभाग प्रमुखाकडे केली असून, त्यांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेणार आहेत.

Municipal Corporation: Updated information will be collected for boundary extension | महापालिका : हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार

महापालिका : हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार

Next
ठळक मुद्देमहापालिका : हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार पाठवलेले प्रस्ताव, हद्दवाढीच्या फाइलींची प्रशासक करणार तपासणी

कोल्हापूर : हद्दवाढीसंदर्भातील अद्ययावत माहिती संकलीत करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जाणार आहे. याचबरोबर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे हद्दवाढीसंदर्भातील प्रस्ताव, फाइलींची मागणी संबंधित विभाग प्रमुखाकडे केली असून, त्यांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या महापालिकेची मुदत संपली असेल त्याची निवडणूक होत नाही तोपर्यंत क्षेत्रात बदल करता येत नाही. यामुळे कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेण्याचा ठरविले आहे. त्यांनी संबंधित विभागाकडून शासनाला पाठवलेले प्रस्ताव, हद्दवाढीच्या फाइल, केलेले पत्रव्यवहार यांची मागणी केली आहे. ही माहिती पाहून त्या पुढील निर्णय घेणार आहेत. तसेच प्राधिकरणची स्थापना नेमकी कशासाठी केली. त्यांची जबाबदारी काय आहे, याचीही माहीती संबंधित विभाग प्रमुखाकडून घेणार आहेत.

दरम्यान, महापालिकेचा नगररचना विभाग हद्दवाढीसंदर्भातील नवीन नियमानुसार कागदपत्रांची पूर्तात करून ठेवणार आहे. यामध्ये प्रस्तावित गावे व शहर यामधील भौगलिक संलग्नता, लोकसंख्या आणि उत्पन्न वाढीचा वेग यांची अद्ययावत माहिती संकलित करणार आहे.

Web Title: Municipal Corporation: Updated information will be collected for boundary extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.