शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

महावितरणने प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी : कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:18 AM

महावितरणने दरवाढ प्रस्तावित केली आहे. ती अन्यायी असून, ती मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीतर्फे कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांना देण्यात आले. यामध्ये घरगुती वापराचे दर दिल्लीप्रमाणे करावेत, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देमहावितरणने प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी : कार्यकारी अभियंत्यांना निवेदनसर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीची मागणी

कोल्हापूर : महावितरणने दरवाढ प्रस्तावित केली आहे. ती अन्यायी असून, ती मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीतर्फे कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांना देण्यात आले. यामध्ये घरगुती वापराचे दर दिल्लीप्रमाणे करावेत, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र  राज्य विद्युत वितरण कंपनीने आगामी पाच वर्षांसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार पुढील पाच वर्षांसाठी या कंपनीने ६० हजार कोटी रुपयांची वाढ मागितलेली आहे.

गेल्या तीन वर्षांतील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी व पुढील पाच वर्षांतील योजनांसाठी हा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव ६०,३१३ कोटी १९ लाख रुपयांचा असला तरी प्रत्येकवर्षी दरवाढ मागितली आहे. म्हणजे २०२०-२१ साठी ५.८ टक्केदरवाढ, २०२१-२२ साठी ३.२५ टक्के, २०२२-२३ साठी २.९३ टक्के, २०२३-२४ करिता २.६१ टक्केआणि २०२४-२५ साठी २.५४ टक्के, अशी वाढ मागितलेली आहे.

यासोबतच स्थिर आकारामध्येही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना पूर्वी ९ रुपये ठोक रक्कम स्थिर आकार म्हणून घेतला जात होता. तो नवीन प्रस्तावानुसार वीज वापरानुसार होणार असून, शून्य ते १०० युनिटला १०० रुपये, १०१ ते ३०० युनिटला ११० रुपये, ३०१ ते ५०० युनिटला ११० रुपये व ५०० युनिटच्यापुढे १२० रुपये आकारण्यात येणार आहेत. घरगुती वापरासाठी वापरलेल्या शून्य ते १०० युनिट वीज ग्राहकांना ३.०५ पैसे प्रतियुनिट दर होता. तो प्रस्तावामध्ये ३.३० इतका मागितला आहे.दिल्लीसारख्या लहान राज्यात गरीब ग्राहकांसाठी वीजदराचा पहिला स्लॅब शून्य ते २०० युनिट असून, त्याचा दर ३ रुपये प्रतियुनिट आहे. तर महाराष्ट्रत याच युनिटचे दर ३ रुपये ५ पैसे आहे. म्हणजेच ते दर दिल्लीच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे राज्यातही असेच दर आकारावेत. २०१७-१८ ते २०१९-२० या कालावधीत ८७४० कोटी रुपये तूट कशी आली, हे जाहीर करावे.शिष्टमंडळात निमंत्रक आर. के. पोवार, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, किशोर घाटगे, अजित सासने, दिलीप देसाई, अशोक भंडारे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर