शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

प्लास्टिक मुक्ती निमित्ताने विविध उपक्रम, महापालिकेचा पुढाकार : गुरुवारपासून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 11:49 IST

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महापालिकेच्यावतीने आज, मंगळवारपासून तीन ...

ठळक मुद्देप्लास्टिक मुक्ती निमित्ताने विविध उपक्रममहापालिकेचा पुढाकार : गुरुवारपासून कारवाई

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महापालिकेच्यावतीने आज, मंगळवारपासून तीन दिवस ‘प्लास्टिक मुक्त व स्वच्छता हिच सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासून प्लास्टिक विक्री करणाऱ्या, वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उप्रकमांची रूपरेषा आखण्याकरीता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.आज, मंगळवारी शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा संकलन करणाऱ्या टिप्परवरील कर्मचाऱ्यांतर्फे एकदाच वापरलेले गेलेले प्लास्टिक गोळा करण्यात येणार आहे. गांधी जयंतीदिवशी बुधवारी श्रमदानातून गांधी मैदान, शहरातील सर्व बागा, अंबाबाई मंदिर परिसर, बिंदू चौक व पार्किंग परिसर, दसरा चौक पार्किंग परिसर, रंकाळा तलाव या ठिकाणी श्रमदान करून प्लास्टिक संकलन करण्यात येणार आहे.

या उपक्रमात शहरातील शाळा, हॉटेल, सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. त्याच दिवशी शहरातून रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी मनपाच्या शाळांमध्ये स्वच्छता स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक गोळा करण्याकरीता शाहूपुरी येथील ई - २ व बी वॉर्ड मंगळवार पेठ येथील आरोग्य कार्यालय कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांनी प्लास्टिक जमा करावे, असे आवाहन आयुक्त कलशेट्टी यांनी केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रभारी उपआयुक्त धनंजय आंधळे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, सचिन जाधव, आरोग्य निरीक्षक माधवी मसुरकर, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार, पर्यावरण अधिकारी अपेक्षा सूर्यवंशी, एम.आय.एस.तज्ज्ञ पूजा बनगे आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर