महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:23 AM2021-01-25T04:23:15+5:302021-01-25T04:23:15+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी छत्रपती ताराराणी सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस प्रशासक ...

Municipal Corporation celebrates Netaji Subhash Chandra Bose Jayanti | महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी छत्रपती ताराराणी सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस प्रशासक डॉ. कादंबरी बलकडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळे, निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी-

कोल्हापूर : शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी महापालिकेच्या वतीने छत्रपती ताराराणी सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस प्रशासक डॉ. कादंबरी बलकडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळे, निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.

--------------

Web Title: Municipal Corporation celebrates Netaji Subhash Chandra Bose Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.