कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिका अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:15 IST2021-02-22T04:15:57+5:302021-02-22T04:15:57+5:30
कोल्हापूर : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. कोल्हापूर शहरात रोज १० ते १५ नवीन रुग्णांची भर ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिका अलर्ट
कोल्हापूर : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. कोल्हापूर शहरात रोज १० ते १५ नवीन रुग्णांची भर पडत आहे. सध्या येथे गंभीर स्थिती नसली तरी कोरोनाची दुसरी लाट शहरात येऊच नये म्हणून महापालिका प्रशासन अलर्ट आहे. यापूर्वी १२ कोरोना केअर सेंटर सुरू होते. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. सध्या आयसोलेशन हॉस्पिटल येथे कोरोना केअर सेंटर सुरू आहे. उर्वरित सेंटर जिल्हा प्रशासनाचा आदेश आल्यानंतर आवश्यकतेनुसार सुरू केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणे, सोशन डिस्टन्सचे पालन न करणे इत्यादींबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधितांना दिले आहेत.
प्रतिक्रिया
आयसोलेशन हॉस्पिटल येथील कोरोना रुग्णांसाठी ७० बेड उपलब्ध असून, सध्या केवळ दोन रुग्णांवर येथे उपचार सुरू आहेत. आज, सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोनासंदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यांनी आदेश दिल्यास उर्वरित कोरोना केअर सेंटरही सुरू केले जातील.
डॉ. अशोक पोळ, मनपा, आरोग्य अधिकारी
चौकट
शिवाजी विद्यापीठ डीओटी सेंटर, शिवाजी विद्यापीठ होस्टेल १, शिवाजी विद्यापीठ होस्टेल १, शिवाजी विद्यापीठ होस्टेल ३, अंडी उबवणी केंद्र, लाइन बाजार, शेंडा पार्क, जैन बोर्डिंग केंद्र व्हाइट आर्मी, फुलेवाडी केंद्र, राजोपाध्येनगर केंद्र, महासैनिक दरबार हॉल अशी १२ केंद्रे महापालिकेकडून यापूर्वी सुरू होती. यामुळे रुग्णालयावरील ताण कमी झाला होता. पुन्हा ही केंद्रे सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.