शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘कटर’च्या तपासासाठी मुंबईचे तपास पथक कोल्हापूरला येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 13:20 IST

नवी मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या खून प्रकरणात वापरलेले कटर मशीन हे कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील एका तरुणाने पुरविल्याच्या निनावी पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या वास्तव्याची गोपनीय माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी घेतली आहे. तसेच कटरच्या तपासासाठी मुंबईचे तपास पथक कोल्हापुरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे‘कटर’च्या तपासासाठी मुंबईचे तपास पथक कोल्हापूरला येणार बिंद्रे हत्याकांड : लक्ष्मीपुरी पोलिसांनी घेतली गोपनीय माहिती

कोल्हापूर : नवी मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या खून प्रकरणात वापरलेले कटर मशीन हे कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील एका तरुणाने पुरविल्याच्या निनावी पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या वास्तव्याची गोपनीय माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी घेतली आहे. तसेच कटरच्या तपासासाठी मुंबईचे तपास पथक कोल्हापुरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील हा खून प्रकरणातील संशयित आहे. त्याचा जुना बुधवार पेठेतील तरुण मित्र आहे. अश्विनी बिंद्रे यांचे वडील जयकुमार बिंद्रे यांनी या निनावी पत्राची प्रत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना पाठविली आहे. संशयित तरुण गेल्या दोन वर्षांपासून फरार आहे. तो अचानक गायब झाल्याने संशय बळावला आहे.

यासंबंधी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्याकडे चौकशी केली असता निनावी पत्र आम्हाला मिळाले आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत असल्याने ते पत्र त्यांना पाठविले आहे. परस्पर या गुन्ह्याचा तपास आम्हाला करता येत नाही. त्यांनी अद्याप आमच्याकडून कोणतीही मदत मागितलेली नाही.

तपासासाठी मदत मागितल्यास आम्ही ती देऊ, असे त्यांनी सांगितले; परंतु लक्ष्मीपुरी पोलिसांनी या तरुणाच्या वास्तव्याची व त्याचा बिंद्रे खून प्रकरणाशी काही संबंध आहे काय, याची गोपनीय माहिती घेतली आहे. त्याच्या कुटुंबीयांसह मित्र व शेजारील लोकांकडे चौकशी केली आहे. या पत्रानुसार मुंबईची तपास यंत्रणा कोल्हापुरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर