शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पार्थिवाला पाणी पाजताना कळले की मृतदेहच बदललाय!, मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचा गलथान कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 11:32 IST

हिंदुजा हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबद्दल मृताचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.

प्रयाग चिखली : वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील कृष्णात महादेव पाटील (वय ४७) यांच्या मृतदेहाऐवजी मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने सतीश रुईया या व्यक्तीचा मृतदेह मुंबईहून वरणगे पाडळी येथे पाठवला. मृतदेहाला अग्नी देण्यापूर्वी मुखात पाणी सोडताना हा गंभीर प्रकार उघडकीस आला. हिंदुजा हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबद्दल मृताचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.वरणगेतील भैरवनाथ हायस्कूलमध्ये शिपाई असलेल्या कृष्णात महादेव पाटील यांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर आठ दिवसांपूर्वी नातेवाइकांनी त्यांना मुंबईत टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी बुधवारी (दि. २८) हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवले. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने कपड्यात गुंडाळून ठेवलेला मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. बिल आणि कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह गावाकडे पाठवण्यात आला.

मृतदेह गावात पोहोचताच अंत्यविधीची तयारी करण्यात आली. स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर मृतदेह सरणावर ठेवण्यात आला. मृताच्या तोंडात पाणी सोडण्यासाठी तोंडावरील कापड काढण्यात आले तेव्हा नातेवाईक आणि नागरिकांना धक्काच बसला; कारण तो मृतदेह कृष्णात पाटील यांच्याऐवजी मुंबईतील सतीश रुईया नावाच्या व्यक्तीचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांची तारांबळ उडाली.हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाशी संपर्क साधून गावकऱ्यांनी तो मृतदेह मुंबईला पाठवला आणि कृष्णात पाटील यांच्या मृतदेहाची शहानिशा करून तो आणण्यासाठी ते मुंबईला रवाना झाले. मनमिळावू आणि लोकांना मदत करण्याची वृत्ती असणाऱ्या कृष्णात पाटील यांच्या आकस्मिक निधनाने लोक अगोदरच हळहळले होते. त्यातच हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने केलेल्या गलथान कृत्याबद्दल लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

मुलांच्या शिक्षणासाठी धडपडकृष्णात पाटील हे मुलांच्या शिक्षणासाठी सतत धडपड करीत होते. एका मुलाला डॉक्टर, तर दुसऱ्या मुलाला प्रशासकीय अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. अनेक गरजूंना वैद्यकीय मदत देण्यातही त्यांचा नेहमी पुढाकार असे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल