शैक्षणिक क्षेत्रात मुदाळ पॅटर्न राज्यात भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST2021-08-22T04:28:09+5:302021-08-22T04:28:09+5:30

सरवडे : मुदाळच्या प. बा. पाटील प्रशाळेने यापूर्वी पूर्व व माध्यमिक शिष्यवृत्तीत राज्यात नेत्रदीपक यश मिळवले आहे. आता एनएमएमएस ...

Mudal pattern in education is heavy in the state | शैक्षणिक क्षेत्रात मुदाळ पॅटर्न राज्यात भारी

शैक्षणिक क्षेत्रात मुदाळ पॅटर्न राज्यात भारी

सरवडे : मुदाळच्या प. बा. पाटील प्रशाळेने यापूर्वी पूर्व व माध्यमिक शिष्यवृत्तीत राज्यात नेत्रदीपक यश मिळवले आहे. आता एनएमएमएस परीक्षेत तब्बल १५५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. त्यामुळे प्रोत्साहन देणारे संस्था चालक, अहोरात्र कष्ट करणारे शिक्षक, विद्यार्थी यांचे परिश्रमाचे हे यश आहे. त्यामुळे मुदाळ पॅटर्न राज्यात भारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी केले.

मुदाळ येथील प. बा. पाटील हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज येथे एमएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते.

यावेळी के. पी. पाटील म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षा व एनएमएमएस परीक्षेतसुद्धा राज्यात सर्वाधिक मुले शिष्यवृत्तीस पात्र ठरली. संस्थेचा नावलौकिक हा राबणाऱ्या शिक्षकांचा व जिद्दीने घडणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामुळे आहे. ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत एकाच वेळी एकाच शाळेतून सुमारे १५५ विद्यार्थी गुणवत्ता व शिष्यवृत्तीधारक ठरले असून हा देशात विक्रम केला आहे.

मुदाळचा शिक्षण पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे. आजपर्यंत या एनएमएमएस परीक्षेत ७५५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून ४ कोटी इतकी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

यावेळी शिक्षण उपनिरीक्षक रवींद्र चौगले, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, सचिव विकासराव पाटील, मुख्याध्यापक एस. एम. पाटील, सुपरवायझर एस. व्ही. रणदिवे आदींसह मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

ए. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. टी. एम. रेडेकर यांनी आभार मानले.

२१ मुदाळ किरण लोहार

मुदाळ येथे एनएमएमएस परीक्षेतील मार्गदर्शक व विद्यार्थी यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष व ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील ,शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार व इतर.

Web Title: Mudal pattern in education is heavy in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.