Mucormycosis In Kolhapur :  म्युकरचे नवे ३ रुग्ण, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 10:54 AM2021-06-25T10:54:06+5:302021-06-25T10:55:25+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात म्युकरचे नवे तीन रुग्ण आढळले आहेत, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या १४० रुग्णांवर ...

Mucormycosis In Kolhapur: 3 new patients of Mucormycosis, one died | Mucormycosis In Kolhapur :  म्युकरचे नवे ३ रुग्ण, एकाचा मृत्यू

Mucormycosis In Kolhapur :  म्युकरचे नवे ३ रुग्ण, एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देम्युकरचे नवे ३ रुग्ण, एकाचा मृत्यू जिल्ह्यात केवळ १,७५८ जणांचे लसीकरण

कोल्हापूर : जिल्ह्यात म्युकरचे नवे तीन रुग्ण आढळले आहेत, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या १४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत २१७ जणांना म्युकरची लागण झाली होती. त्यापैकी ४३ जण बरे होऊन घरी गेले आहेत, तर १४० जणांवर उपचार सुरू आहेत. ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील १,७५८ नागरिकांना ४१ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. ५०९ जणांना पहिला डोस, तर १,२४९ जणांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील केवळ ७५ जणांना लस देण्यात आली आहे. आता लस कधी येणार याचीच प्रतीक्षा सुरू आहे.

Web Title: Mucormycosis In Kolhapur: 3 new patients of Mucormycosis, one died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.