शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

वाहनचालकांचा बेफिकीरपणाच अधिक

By admin | Updated: April 24, 2017 01:03 IST

वाहतूक पोलिसांच्या कारवाईत स्पष्ट : परवाना नसणाऱ्यांची संख्या सर्वाधिक; तीन हजार वाहकांना दंड

एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूरशहरात वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत दि. १७ ते १८ एप्रिल या दोन दिवसांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सत्र राबविले. शहरात सुमारे २ हजार ९९९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये ६ लाख ९०० रुपये दंडाची रक्कम वसूल झाली. या कारवाईमध्ये सर्वाधिक वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसणाऱ्या १२५७ जणांवर कारवाई झाली. त्यापाठोपाठ नियमबाह्ण नंबरप्लेट लावणे ४८७, प्रवेश बंद मार्गातून (एकेरी मार्ग) वाहन चालवणे ३६३ अशा बेफिकीर वाहनचालकांचा समावेश असल्याचे वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून निष्पन्न झाले. वाहनांची संख्या वाढल्याने शहरासह उपनगरांत वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्ण वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे चित्र होते.या दोन दिवसांत मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्कतपणे वावरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली. कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्य वाहनचालकांना जाग्यावर २०० ते १ हजार रुपये दंडाची पावती दिली गेली. अज्ञान मुलांना आवर घालाअज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते. या मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे पादचारी नागरिकांच्या जिवालाही धोका पोहोचत आहे. पालकांचे दुर्लक्ष, शाळा-महाविद्यालयांत मार्गदर्शनाचा अभाव आदी कारणे कारणीभूत ठरत आहेत.अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना मिळाल्यास त्यांच्यासह पालकांना हजार रुपये दंड भरावा लागणार तर आहेच, शिवाय अपघात झाल्यास गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मुलांबरोबर पालकांनाही शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना आवर घालणे गरजेचे आहे. दोन दिवसांतील कारवाईचा आलेख वाहन नियम गुन्हेदंड वसूल रहदारीस अडथळा६६१३२००लायसन्स नसणे१२५७२५१४००तिब्बल सीट१०७२१४००मोबाईल वापरणे४९ ६२००अस्पष्ट नंबरप्लेट १४१२८२००नियमबाह्ण नंबरप्लेट४८७४०७००प्रवेश बंदी३६३५६८००सिग्नल तोडणे२४४५१६००क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक१२३२४००कर्णकर्कश हॉर्न वाजविणे४८००रिक्षा इतरत्र उभी करणे२४००फिल्मिंग काच लावणे१२००झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबविणे७७१५४००विरुद्ध दिशेने वाहन चालविणे१९३८००पोलिसांचे आदेश न पाळणे५१०००क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे ७१४००‘नो पार्किंग’मध्ये वाहन उभा करणे४८००वाहनास प्रखर दिवा बसवणे३ ६००सीटबेल्ट न लावणे५६११२००इतर११ २८००पोलिस ठाणे१४९३०३००मोबाईलवर बोलणे टाळले पाहिजेशासकीय कर्मचारी असो, किंवा महाविद्यालयीन तरुण वाहन चालविताना मोबाईलवर बोलत जाणे ही त्यांची ‘स्टाईल’च बनली आहे. त्यांना वेळीच रोखण्यासाठी पालक किंवा पोलिस प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयीन तरुणांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक वाहनचालकाने मोबाईलवर बोलणे टाळले पाहिजे. वेगाला मर्यादा नाही : शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनधारकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक व्यवस्था म्हणजे शहरातील मोठी समस्या आहे. शासकीय कर्मचारी असो किंवा महाविद्यालयीन तरुण वाहन चालविताना मोबाईलवर बोलत जाणे ही त्यांची ‘स्टाईल’च बनली आहे. काही तरुण सायरन काढून मोटारसायकली सुसाट वेगाने चालवत असतात. काही वेळा ट्रिपल सीटवरून बिनदिक्कतपणे फिरत असतात. शहरातील प्रत्येक वाहनाला वेगमर्यादा घालून दिली पाहिजे.