रूकडी येथे महावितरणची वसुली पाडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:16+5:302021-07-01T04:17:16+5:30

रूकडी येथे वाढती थकीत वीज बिल वसुलीसाठी येथील वीज महामंडळाचे कर्मचारी वारंवार सूचना देऊन बिल न भरणा-या ग्राहकांचे वीज ...

MSEDCL's recovery stopped at Rukdi | रूकडी येथे महावितरणची वसुली पाडली बंद

रूकडी येथे महावितरणची वसुली पाडली बंद

रूकडी येथे वाढती थकीत वीज बिल वसुलीसाठी येथील वीज महामंडळाचे कर्मचारी वारंवार सूचना देऊन बिल न भरणा-या ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद केले.

गेली दहा दिवस वीज वितरणाचे कर्मचारी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. ज्या ग्राहकांना वारंवार सूचना देवून ही वीज बिल भरले नाहीत, अशा ८० ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद केल्याची बातमी भागात पसरताच वीजजोडणी बंद केलेले ग्राहक आरपीआयचे सतीश माळगे यांना पाचारण करून वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढला. याठिकाणी महावितरणचे अभियंता सांगलीकर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत वीज कनेक्शन का तोडले, याचा जाब विचारला. कोरोनाने मिळकत नसताना वीज बिल कोठून भरायचे असा अनेक प्रश्नांनी अधिकारी निरुत्तर झाले.

८० वीज ग्राहकांचे परत वीज जोडणी न केल्यास कार्यालयातून बाहेर पडणार नाही, असा इशारा सतीश मळगे, प्रदीप ढाले, संबोधी कांबळे, अमित शिंदे, सुहास हुपरीकर, सुमित कांबळे, विशाल गायकवाड, अभिजित कांबळे, स्वप्निल कांबळे, वैभव गायकवाड यांनी दिले. हातकणंगलेचे अभियंता महिलापुरे यांच्याशी संपर्क साधून वीजजोडणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. वाढता अधिक गोंधळ पाहता तोडलेले वीज कनेक्शन परत जोडणी करण्याचा आदेश अधिकारी यांनी दिले. वीज कर्मचारी यांनी वीज जोडणी केल्यानंतर जमलेले लोक माघारी परतले. दरम्यान, वीज कनेक्शन परत तोडल्यास रिपब्लिकन पक्षाच्यावतीने महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संपर्क प्रमुख सतीश माळगे, संबोधी कांबळे यांनी दिला आहे.

Web Title: MSEDCL's recovery stopped at Rukdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.