महावितरणतर्फे ६७ कर्मचाऱ्यांचा गौरव, उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 06:48 PM2020-08-17T18:48:08+5:302020-08-17T18:49:39+5:30

महावितरणच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात ६७ वीज कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार देऊन प्रभारी मुख्य अभियंता अंकुर कावळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

MSEDCL honors 67 employees | महावितरणतर्फे ६७ कर्मचाऱ्यांचा गौरव, उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार

महावितरणच्यावतीने कोल्हापूर विभागतील गुणवंत कर्मचाऱ्यांना प्रभारी मुख्य अभियंता अंकुर कावळे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आले.

Next
ठळक मुद्देमहावितरणतर्फे ६७ कर्मचाऱ्यांचा गौरवउत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार

कोल्हापूर : महावितरणच्याकोल्हापूर विभागीय कार्यालयात ६७ वीज कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार देऊन प्रभारी मुख्य अभियंता अंकुर कावळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

महावितरण प्रत्येक वर्षी गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव करते. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ जनमित्र, ६ यंत्रचालक तर सांगली जिल्ह्यातील २५जनमित्र व ५ यंत्रचालकांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी सहायक महाव्यवस्थापक सुनील पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे, कार्यकारी अभियंता नरेंद्र ताडे, सागर मारूलकर, डॉ. नामदेव गांधले, सुनील शिंदे, विजय फुंदे, राजेंद्र देसाई यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

कोल्हापूर : सागर पोवार (गगनबावडा), किशोर कांबळे (कळे), विनायक पाटील (कोडोली), उत्तम सुतार (परिते), विजय गुरव (पन्हाळा), मारुती पोवार (कदमवाडी), मुस्ताक नगारजी (फुलेवाडी), तुकाराम मोहिते (शाहूवाडी), संतोष कपाले (राधानगरी), मोहन शेलार (मुरगूड), गजानन तिवडे (हुपरी), प्रकाश सावंत (कागल), राजगौतम कांबळे (गारगोटी), विकास सूर्यवंशी (मार्केट यार्ड), दत्तात्रय राजाराम (कोल्हापूर पश्चिम), महमदरफी मकानदार (कोल्हापूर शहर उत्तर), मेहबूब खुटेपाड (कोल्हापूर शहर पूर्व), अजहर शेख (कोल्हापूर शहर मध्य), अरुण दळवी-पाटील (इचलकरंजी ए), अशोक माने (इचलकरंजी बी), नीलेश दुधबरवे (इचलकरंजी ग्रामीण), शिवाजी पवार (वडगाव), सुशांत हिरापुरे (जयसिंगपूर), सलीम सुतार (कुरुंदवाड), आशितोष भाबिरे (शिरोळ), सुशीलकुमार पाटील (हातकणंगले), श्रावण मटकर (नेसरी), राम शिराढोणे (चंदगड), प्रथमेश काटकर (आजरा), मल्लिकार्जुन किल्लेदार (गडहिंग्लज), नायकू शेवाळे (चाचणी विभाग कोल्हापूर्).

राजकुमार पाटील (कोल्हापूर ग्रामीण १), लक्ष्मण खुटाळे (कोल्हापूर ग्रामीण २), शशिकांत सणगर (कोल्हापूर शहर), इराप्पा नागणसूर (इचलकरंजी), सुनील पाटील (जयसिंगपूर), प्रमोद मनगुटकर (गडहिंग्लज) या ६ यंत्रचालकांचाही गौरव करण्यात आला.

सांगली : प्रशांत पाटील (तासगांव १), नामदेव घोडके (विश्रामबाग), संजय सुतार (मिरज ग्रामीण १), विठ्ठल शेळके (सावळज), संदीप जिवतोडे (तासगांव २), दिनकर नाईक (सांगली दक्षिण), राजेंद्र कांबळे (सांगली पश्चिम), आसिफ नदाफ (सांगली उत्तर), प्रदीप पवार (माधवनगर), प्रदीप बावचकर (सांगली मध्य), किरण सोनवणे (मिरज शहर), रामदास बागुल (इस्लामपूर २), सुभाष फार्णे (आष्टा), प्रताप पाटील (इस्लामपूर १), श्रीकांत पाटील (शिराळा), गोविंद सागर (आटपाडी), सुरेश मेश्राम (कडेगाव), गणेश भोसले (पलूस), प्रमोद कदम (विटा २), दीपक जाधव (कवठेमहांकाळ), सुनील माने (जत), गणेश पवार (संख), विनायक पाटील (मिरज ग्रामीण २), अविनाश डफळापूरे (चाचणी विभाग), यंत्रचालक नानासोा पाटील (सांगली ग्रामीण), अशोक रास्ते (सांगली शहर), बळिराम कुंभार (इस्लामपूर), नंदकुमार धेंडे (विटा), सुगंदराव पवार (कवठेमहांकाळ).

 

Web Title: MSEDCL honors 67 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.