वीज बिल भरण्याचे महावितरणचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:44+5:302021-02-09T04:26:44+5:30
कोल्हापूर : महावितरणची आर्थिक सद्यस्थिती लक्षात घेऊन घरगुती, वाणिज्य, औद्योगिक यासह सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरावे, असे आवाहन ...

वीज बिल भरण्याचे महावितरणचे आवाहन
कोल्हापूर : महावितरणची आर्थिक सद्यस्थिती लक्षात घेऊन घरगुती, वाणिज्य, औद्योगिक यासह सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत.
ग्राहकांना कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून, भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून, नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेश पाठवून वारंवार वीज बिल भरण्याबाबत विनंती केली आहे. तरीही अद्याप बहुतांश ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केलेला नाही. तरी वीज ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे. कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील ३ लक्ष २६ हजार ४२६ वीजग्राहकांनी दि.१ एप्रिल २०२० पासून वीज बिलांचा भरणा केला नाही. या ग्राहकांकडे २३६ कोटी ९२ हजार रुपयांची थकबाकी आहे. तरी या ग्राहकांनी वीज बिल भरून घ्यावे. महापूर असो वा कोरोनासारखी इतर आपत्ती कोल्हापूरकरांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण सदैव सज्ज असते. तेव्हा वीज ग्राहकांनीही आपली जबाबदारी पार पाडून सहकार्य केल्यास दर्जेदार वीज सेवा देण्यासाठी महावितरणला बळ मिळेल.