‘एमपीएससी’ परीक्षार्थींनी तीन तास आधी केंद्रावर यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST2021-03-10T04:24:45+5:302021-03-10T04:24:45+5:30
या परीक्षेसाठी सुमारे १४ हजार परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. शहरातील महाविद्यालये आणि हायस्कूल अशा एकूण ४१ उपकेंद्रांवर ...

‘एमपीएससी’ परीक्षार्थींनी तीन तास आधी केंद्रावर यावे
या परीक्षेसाठी सुमारे १४ हजार परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. शहरातील महाविद्यालये आणि हायस्कूल अशा एकूण ४१ उपकेंद्रांवर परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन तास अगोदर (सकाळी सात वाजता) केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांचे मूळ ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, छायाचित्र) आणि प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणायचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उमेदवारांनी मास्क वापरणे आणि सॅनिटायझर जवळ ठेवणे अनिवार्य असल्याचे भाऊसाहेब गलांडे यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनासह विविध कारणांमुळे तीन वेळा लांबणीवर पडलेली ही राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी होणार आहे. पाच दिवसांवर परीक्षा आली असल्याने परीक्षार्थींकडून तयारी, उजाळणीचा वेग वाढला आहे.